ऋतुजा लटके आज उमेदवारी अर्ज भरणार! त्याआधीच ‘हे’ तिघे अर्ज भरुन मोकळे
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा! उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By Poll Election) ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार आज आपआपला अर्ज भरतील. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपते आहे. त्यामुळे आजचा दिवस या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. ज्या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये पोटनिवडणुकीत लढत होणार आहे, त्यांच्याआधी (Nomination) अन्य तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना (Maharashtra politics) वेग आला आहे.
ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्याआधी कुणी कुणी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरले, त्यांची नावं समोर आली आहेत. राकेश अरोरा )क्रांतिकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्थान जनता पार्टी), मिलिंद कांबळे (अपक्ष) आणि निना खेडेकर (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
Three people have filed their nomination for the #AndheriEastBypoll.
They are Rakesh Arora (Krantikari Jai Hind Sena and Hindustan Janata Party), Milind Kamble (Independent) and Nina Khedekar (Independent).
— TOI Mumbai (@TOIMumbai) October 13, 2022
एकीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार दिवगंत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेलही आपला अर्ज दाखल करणार आहेत. मुरजी पटेल हे खरंतर गुरुवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. पण काही कारणास्तव त्यांना गुरुवारी अर्ज दाखल करता आला नव्हता.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार, पालिकेला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा आदेश मान्य करावा लागणार आहे. गुरुवारी याबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली होती.
दरम्यान, ऋतुजा लटके यांच्याबाबत दिलासादायक निर्णय जर आला नाही, तर काय करायचं, याचा प्लान बी देखील शिवसेनेनं आखला होता. पण सुदैवानं हायकोर्टाने हा प्रश्न निकाली काढलाय. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मुद्दा अखेर निकाली निघालाय.
आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. येत्या 3 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदार पार पडले. तर 6 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागले. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती.