Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही, अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका

इंदापूर तालुक्यात दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही, असं म्हणत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे (Ankita Patil Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर टीका केली आहे.

इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही,  अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका
दत्तात्रय भरणे अंकिता पाटील ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:19 PM

पुणे : इंदापूर तालुक्यात दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही, असं म्हणत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे (Ankita Patil Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर टीका केली आहे. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्स्या भारती मोहन दुधाळ यांनी केलेल्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आलेल्या कौठळी येथील तीन वर्ग खोल्यांच्या 22 लाख 50 हजार रुपये विकास निधीच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी राज्यमंत्र्यांनी दडपशाहीचा वापर करण्यात आला. स्थानिक तसेच पोलीस प्रशासनाचा वापर करीत या विकासकामाला अडथळा निर्माण केला असून अशा दडपशाहीचे राजकारण चालू देणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली.

अंकिता पाटील ठाकरे नेमकं काय म्हणाल्या?

अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,’ जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामासाठी तसेच कौठळी येथील तीन वर्ग खोल्यांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेशी सातत्याने पत्रव्यवहार करून तसेच संपर्क करून या तीन वर्गखोल्या मंजूर करून घेतल्या होत्या. त्याच्याच भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना राज्यमंत्र्यांनी आपल्या बळाचा वापर करीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या विकास कामाच्या उद्घाटना वेळी अडथळा आणला. हे चुकीचे आहे अशा प्रकारच्या दडपशाही चे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही. यानंतर अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते सदर कामाचे उदघाटन करण्यात आले.

अंकिता पाटील ठाकरे यांची फेसबुक पोस्ट

अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन

कौठळी येथे जवळपास 42 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन ३ वर्ग खोलीसाठी 22.50 लक्ष रूपये, माने भंडलकर वस्ती महादेव मंदिर सभामंडपासठी 4 लक्ष, नवीन अंगणवाडी इमारत बांधकामसाठी 8.50 लक्ष,भीमराव काळेल वस्ती ते बळपुडी रोड कडे जाणारा रस्त्यासाठी 5 लक्ष व गावठाण येथे हायमास्ट दिवा हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या भारतीताई दुधाळ त्यांनी मंजूर केलं असल्याचं अंकिता पाटील ठाकरे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव, माजी सरपंच प्रकाश काळेल, सोशल मीडिया अध्यक्ष साहेबराव पिसाळ, भारतीय जनता पार्टी विस्तारक राजकुमार जठार व कौठळी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

इतर बातम्या:

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

Tax on Cryptocurrency: अंदाज साफ चुकला की राव ! क्रिप्टोप्रेमींची घोर निराशा, मान्यता नाहीच, उलट कराचा बोजा

Ankita Patil Thackeray slam NCP Leader Dattatray Bharane on Indapur Politics

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.