“बिहारच्या जनतेने लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे गुंडाराज नाकारले”, अनिल बोंडेची टीका

"बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारले, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे." (Anil Bonde criticize Lalu Prasad Yadav and Congress on Bihar Election)

बिहारच्या जनतेने लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे गुंडाराज नाकारले, अनिल बोंडेची टीका
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 12:33 PM

अमरावती : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीए सध्या 129 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कालपर्यंत निवडणुकीचे एक्झिट पोल हे एनडीएच्या विरोधात होते. मात्र, आज सकाळपासूनच जे ट्रेंड समोर येत आहे. त्यामध्ये एनडीए पुढे दिसत आहे. “बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारले, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.” (Anil Bonde criticize Lalu Prasad Yadav and Congress on Bihar Election)

बिहारच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कालपर्यंत राजद पुढे येईल, अशी चर्चा होती. मात्र, भाजप आणि जदयूला मतदारांनी स्वीकारलं आहे. काँग्रेस आणि राजदला जनतेने नाकारलं आहे. नितीशकुमार यांनी बिहार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात परिवर्तनाचे काम केलं. सर्व सामान्य जनतेने एनडीएला कौल दिला, असं अनिल बोंडे म्हणाले.

बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता: प्रवीण दरेकर

शंभर टक्के आकडे बदलतील, वाट पाहायला पाहिजे. काँग्रेसचे आकडे वाढत नाहीत. त्यामुळे अजून वाट पाहायला पाहिजे. अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहावी लागेल.  तेजस्वी यादव यांनी बिहारचा फार विकास केलेला नाही, असं महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर यांनी नितीश कुमार हेच भाजप आणि जदयू आघाडीचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं आश्वासन दिलं नव्हत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. बिहारमध्ये मोठा भाऊ भाजप ठरलं तरी देखील मुख्यमंत्री नितीशकुमार हे मुख्यमंत्री होतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान, एनडीएनं 127 जागांवर मुसंडी मारली आहे.  भाजपनं 73, जदयू  47 जागांवर आघाडी मिळवली आहे. महागठबंधन सध्या 101 जागांवर आघाडीवर आहे.  राजद  61, काँग्रेस 21, इतर 19 जागांवर आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारमध्ये NDA ची मुसंडी, महागठबंधन पिछाडीवर

Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

(Anil Bonde criticize Lalu Prasad Yadav and Congress on Bihar Election)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.