…म्हणून मी गृहमंत्रिपद घेतलं : अनिल देशमुख
"नागपूरसह राज्यभरातील गुन्हेगारी मोडीत काढू," असे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh on Home minister) म्हणाले.
पुणे : महाविकासआघाडीच्या खातेवाटपानंतर अनेक मंत्री कामाला लागले आहेत. धनंजय मुंडे, सुभाष देसाई, दादा भुसे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळांसह दिग्गज मंत्र्यांचा पदभार (Anil Deshmukh on Home minister) स्विकारला. गृह खातं मिळाल्यानंतर अनिल देशमुख पहिल्यादांच बारामतीत दाखल झाले. “नागपूरसह राज्यभरातील गुन्हेगारी मोडीत काढू,” असे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh on Home minister) म्हणाले.
“नागपूरचे मुख्यमंत्री असताना ऑरेंज सिटी ही ओळख पुसून क्राईम सिटी अशी नागपूरची ओळख निर्माण झाली हे मोठं दुर्दैव आहे. मात्र मी तसं होऊ देणार नाही. गृह मंत्रालय माझ्यासाठी नवीन असलं, तरी मी पदभार स्विकारल्यानंतर सर्व नेत्यांसोबत बैठक आयोजित करणार आहे. त्यावेळी इतर मंत्रालयांशी चर्चा करुन यावर काम करेन.” असे अनिल देशमुख म्हणाले.
“गृहमंत्रिपदावर काम करण्यासाठी अनेक इच्छुक असतात. कोणाकडे गृहमंत्री याची सर्व ठिकाणी चर्चा होती. गृहमंत्र्यांची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. म्हणून मी ते घेतलं. कारण मला चॅलेंज घ्यायला आवडतात.” असेही अनिल देशमुख (Anil Deshmukh on Home minister) म्हणाले.
“येत्या आठ तारखेला मी गृहमंत्री पदाचा पदभार स्विकारेन. ही जबाबदारी योग्य रित्या पार पाडेन. मी नक्कीच प्रभावशाली काम करुन दाखवेन. नागपूरसह राज्यभरातील गुन्हेगारी मोडीत काढू. तत्कालीन गृहमंत्र्यांना कदाचित वेळ मिळाला नसेल,” असेही अनिल देशमुख म्हणाले.
“एल्गारचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, त्याबाबत सगळी माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल,” असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
“जेएनयूमध्ये घडलेल्या घटनेचे राज्यभर ते पडसाद उमटत आहेत, त्याची माहिती मी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेत आहे,” असेही देशमुख म्हणाले.
“प्रभावशाली काम करुन दाखवणार, नागपूरसह राज्यभरातील गुन्हेगारी मोडीत काढू, तत्कालीन गृहमंत्र्यांना कदाचित वेळ मिळाला नसेल. असा टोमणाही भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना (Anil Deshmukh on Home minister) लगावला.