Anil Deshmukh:आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा आतापर्यंतचा एकूण घटनाक्रम पाहता भाजप नेत्यांना अनेक गोष्टींची वेळेआधीची चाहुल लागल्याचे दिसून आले होते. | Anil Deshmukh CBI

Anil Deshmukh:आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 10:04 AM

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजप खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील, असा गर्भित इशारा मनोज कोटक यांनी दिला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. (BJP leader Manoj Kotak on Anil Deshmukh CBI probe in Mumbai)

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा आतापर्यंतचा एकूण घटनाक्रम पाहता भाजप नेत्यांना अनेक गोष्टींची वेळेआधीची चाहुल लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे देशमुखांसाठी आगामी दिवस कठीण असतील, या मनोज कोटक यांच्या वक्तव्याचा अर्थ नक्की काय असावा, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तर दुसरीकडे अनिल देशमुख हे आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) चौकशीला सामोरे जाणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते ज्ञानेश्वरी बंगल्यावरुन सांताक्रुझच्या डीआयओच्या कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले. आता ते डीआयओच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात करतील. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे.

परमबीर सिंह चौकशीत काय म्हणाले होते?

सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. या आरोपावर अनिल देशमुख काय बोलणार, हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांचा बचाव करण्यास असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

NIA प्रमुख अनिल शुक्लांची तडकाफडकी बदली, हसन मुश्रीफांकडून संशय व्यक्त

(BJP leader Manoj Kotak on Anil Deshmukh CBI probe in Mumbai)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.