अनिल देशमुखांनी उल्लेख केलेला ‘तो’ अहवाल समोर, सचिन वाझेंचं बिंग फुटलं?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. आता चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर आला आहे.

अनिल देशमुखांनी उल्लेख केलेला 'तो' अहवाल समोर, सचिन वाझेंचं बिंग फुटलं?
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 11:53 AM

Anil Deshmukh Chandiwal Aayog Report : “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” असा आरोप सचिन वाझे याने केला होता. यानतंर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. आता चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांसाठी कोणतेही पैसा जमा केलेले नाहीत, असं उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुखांनी यांनी स्वत:च चांदिवाल आयोगाचा एक अहवाल समोर आणला आहे. या चांदिवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चीट दिली आहे. या अहवालात सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांसाठी कोणतेही पैसा जमा केलेले नाहीत, असं उत्तर दिले आहे. तसेच देशमुखांनी किंवा त्यांच्या कार्यालयातून कुणी बार मालकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितलेले मला आठवत नाही, असेही सचिन वाझे यांनी यावेळी म्हटले होते.

चांदिवाल आयोगात नेमकं काय?

  • प्रश्न : वैयक्तिक कर्मचारी किंवा देशमुखांशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे पैशांची मागणी केली आहे का?
  • सचिन वाझेंचं उत्तर : माझ्याकडून वैयक्तिकरित्या नाही.
  • प्रश्न : देशमुखांनी किंवा त्यांच्या कार्यालयातून कुणी बार मालकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितले का?
  • सचिन वाझेंचं उत्तर : मला आठवत नाही.
  • प्रश्न : तुम्ही बारच्या मालकाकडून किंवा बार शी संबंधित लोकांकडून पैसे गोळे केले का
  • सचिन वाझेंचं उत्तर : नाही

सचिन वाझेंचे आरोप काय?

“जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असं सचिन वाझे यांनी काल ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

अनिल देशमुख काय म्हणाले?

काल देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचा आधार घेत माझ्याविरोधात पुन्हा एकदा आरोप करण्यास सांगितले. सचिन वाझे हा एक दहशतवादी असून त्याच्यावर दहशतवादी कट रचल्याप्रकरणी आणि दोन खून केल्याचे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये आहे. अशा सचिन वाझेचा उपयोग देवेंद्र फडणवीसांना माझ्याविरोधात आरोप करण्यासाठी घ्यावा लागतो, ही खूप शरमेची बाब आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.