Photo| राष्ट्रवादी काँग्रेसचा अभूतपूर्व जल्लोष, अनिल देशमुखांची जामीनावर सुटका
सचिन वाझे यांनी तसेच परमवीर सिंह यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे मला फसवण्यात आलं, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली
मुंबईः 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी आर्थर रोड तुरुंगाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष पहायला मिळाला. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit pawar), खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, आदी नेते यावेळी उपस्थित होते.
ईडी आणि सीबीआय या दोन तपास यंत्रणांद्वारे अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज जामीनावर त्यांची सुटका झाली.
अनिल देशमुख जेलबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची गळाभेट घेतली. नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवले.
त्यानंतर मोठ्या ओपन जीपवर देशमुख यांचा ताफा सिद्धीविनायक मंदिराच्या दिशेने निघाला.
असंख्य कार्यकर्त्यांच्या जल्लोषात अनिल देशमुख यांचा ताफा सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी निघाला. वाटेत ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी कऱण्यात आली. त्यांचं औक्षण करण्यात आलं.
सचिन वाझे यांनी तसेच परमवीर सिंह यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे मला फसवण्यात आलं, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.