Breaking : गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु- भातखळकर

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु असल्याचा गंभीर आरोप केलाय.

Breaking : गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु- भातखळकर
भाजप आमदार अतुल भातखळकर. माजी गृहमंत्री अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 4:01 PM

मुंबई : सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. अशावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. “मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी”, असं ट्वीट करत भातखळकर यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केलीय. (Atul Bhatkhalkar’s allegations on home minister anil deshmukh for destruction of evidence)

अनिल देशमुखांचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. या प्रकरणात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरुन आपण राजीनामा देत असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केलाय. राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु असल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय. इतकच नाही तर CBI ने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

राजीनामा पत्रं, जसंच्या तसं

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती

आपला

अनिल देशमुख

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

Anil Deshmukh resign: देशमुखांनी राजीनामा देतो सांगताच पवारांनी एका सेकंदात होकार दिला; नेमकं काय घडलं? वाचा

Atul Bhatkhalkar’s allegations on home minister anil deshmukh for destruction of evidence

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.