मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई होणार: अनिल देशमुख

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं अनिल देशमुख यांनी सप्ष्ट केले. Anil Deshmukh Mohan Delkar suicide case

मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई होणार: अनिल देशमुख
मोहन डेलकर, अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 3:02 PM

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दादरा आणि नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं म्हटलेय. डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं देशमुख यांनी सप्ष्ट केले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेतली. (Anil Deshmukh said investigation will done in MP Mohan Delkar suicide case)

अनिल देशमुख काय म्हणाले?

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले, अशा व्यक्तीने आत्महत्या केल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होते. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली यामागे काय कारण असेल? तसेच त्यांनी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत. त्यापैकी कोणी जबाबदार आहे का? दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे जबाबदार आहेत का? त्यांच्या दबावाखाली आत्महता केली का? याचा आम्ही तपास करु, असं अनिल देशमुख म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का? प्रफुल्ल पटेल यांचा प्रशासनावर दबाव होता म्हणून मुंबईत आत्महत्या केली का? तिथे न्याय मिळणार नाही म्हणून मुंबईत आत्महत्या केली का?, असे अनेक सवाल उपस्थित होतात. मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री म्हणाले.

स्थानिक भाजप नेत्यांकडून डेलकर यांना त्रास, सचिन सावंतांचा दावा

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याविषयी बोलताना डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जातोय. खोट्या केसेस टाकल्या जातायत अशा तक्रारी यापूर्वी केल्या होत्या, असल्याची माहिती दिली. भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी आपल्या 15 पानी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे, प्रफुल्ल पटेल सध्या दादरा नगर हवेलीत प्रशासक आहेत. डेलकर यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा दावा सावंत यांनी केला. अपक्ष खासदार डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. दादरा नगर हवेलीत आत्महत्या केली असती तर मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळाला नसता, असं त्यांना कदाचित वाटलं असेल

दादरा आणि नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचं 22 फेब्रुवारीला समोर आलं होते. डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केलीय. मृत खासदार मोहन डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. ही सुसाईड नोट 15 पानांची असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

मोहन डेलकरांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या 15 पानी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

दादरा आणि नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांनी काल मुंबईत आत्महत्या केली. मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. ही नोट सुमारे 15 पानांची आहे. यात त्यांनी आपल्या आत्महत्येबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास सुरू झालाय. या तपासासाठी पोलीसांनी एका विशेष पथकाची स्थापना केलीय. पोलीस सर्व अंगाने या घटनेचा तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या:

खासदार मोहन डेलकर आत्महत्येचं गूढ वाढलं; सुसाईड नोटमध्ये काय?

तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

(Anil Deshmukh said investigation will done in MP Mohan Delkar suicide case)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.