मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चिल्लर लोक, त्यांना उत्तर द्यावं इतकी त्यांची लायकी नाही, अनिल परबांची टीका

विधान परिषद निवडणुकीनंतर सरकार पडणार हे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीका अनिल परब यांनी केली. Anil Parab BJP leaders

मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चिल्लर लोक, त्यांना उत्तर द्यावं इतकी त्यांची लायकी नाही, अनिल परबांची टीका
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 5:19 PM

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात पडणार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या भाजप नेंत्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आशिष शेलार किंवा इतर भाजप नेत्यांची विधानं वैफल्यग्रस्त माणसांची विधानं आहेत. मोठा पक्ष ठरुनही सरकार बनवू शकले नाहीत, याची सल त्यांना आहे. महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं भाजप नेत्यांना वैफल्य आले आहे, असं अनिल परब यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले. ( Anil Parab criticize BJP leaders)

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालणार आहे. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेलेले नेते सोडून जाऊ नये म्हणून भाजप नेते सरकार पडणार असल्याची भाषा करत असल्याचे अनिल परब म्हणाले. विधान परिषद निवडणुकीनंतर सरकार पडेल असे सांगणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहे. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी भाजप नेत्यांना बोलावं लागतेय. भाजपकडे दुसऱ्या पक्षातून गेलेले नेते माघारी जाऊ नये म्हणून भाजपकडून तारखा देण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: आपल्या मार्गाने चालले आहेत. जे आरोप करतात ते चिल्लर लोक आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर द्यावं इतकी त्यांची लायकी नाही. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार काम करत आहे, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले. ( Anil Parab criticize BJP leaders)

मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला

महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाहीत. सर्व प्रश्नांवर तिन्ही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेत आहेत. त्यामुळे कोणत्याही कुरबुरी नाहीत. शिवसेना किंवा मविआला सूडाचं राजकारण करायचे नाही. ठाकरे सरकार आणि ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. ईडीचा वापर, सीबीआयचा वापर करत आहात. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना करु द्यायला हवा होता. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप अनिल परब यांनी केला.

यंत्रणांचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. महानगरपालिकेची कारवाई न्यायालयानं थांबवलेली नाही. बेकायदेशीर बांधकाम पाडू नका, असं हायकोर्टानं म्हटलं नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात प्रताप सरनाईकांनी भूमिका घेतली होती. प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर येईल. जे केंद्र सरकारविरोधात बोलतात त्यांना भीती दाखवण्याचा प्रकार आहे. आम्ही चौकशांना घाबरत नाही. सूडाचं राजकारण यापूर्वी केलं नव्हतं, सूडाचं राजकारण कधीही टिकलेलं नाही. आमच्या चूका दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगल्या सूचना असतील तर सांगा, एकमेकांना मदत करुन राज्याचा विकास करुन, असं अनिल परब म्हणाले.

कोरोनापासून जनतेला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारं अथक प्रयत्न केले. कोरोनात सरकारनं जे काम केले त्याबद्दल संपूर्ण देशानं राज्याचं कौतूक केले. महाविकास आघाडीच्या ज्या योजना ठरल्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम करणार आहे.

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मागील सरकारनं दिलेले वकील सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत. सरकारनं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा अर्ज केला. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे, राज्यानं स्थगिती दिलेली नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. नामवंत वकील यासाठी लढत आहेत. स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं अनिल परब यांनी सांगितले. ( Anil Parab criticize BJP leaders)

संबंधित बातम्या :

Anil Parab | ईडीच्या कारवाईवर परिवहन मंत्री अनिल परबांची प्रतिक्रिया

सुपारी घेतल्याशिवाय मनसे कामच करू शकत नाही, त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून; अनिल परब यांचा घणाघात

( Anil Parab criticize BJP leaders)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.