Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab Ed Enquiry : अनिल परब यांना ईडीकडून समन्स, आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Anil Parab News : शिवसेना नेते आणि परिहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे.

Anil Parab Ed Enquiry : अनिल परब यांना ईडीकडून समन्स, आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश
अनिल परब, परिवहन मंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 6:11 AM

मुंबई : राज्याच्या राजकारणातून आत्ता एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकीकेड आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीत सध्या शिवसेनेचे (Shivsena) नेते व्यस्त आहे. अशातच शिवसेनेच्या गोटातलं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना नेते आणि परिहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांना ईडीने समन्स (ED) बजावले आहे. तसेच आज चौकशीला त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आज अनिल परब हे ईडीसमोर चौकशीला हजर राहणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने परबांच्या मुंबईतील घरावर, कार्यालयावर आणि रत्नागिरीतील रिसॉर्टवर तसेच परबांच्या निकटवर्तीयांवर धाडसत्र राबवलं होतं. त्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामपंयातीकडून काही कागदपत्रही ताब्यात घेतली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या अनेक दिवासांपासून याच रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप भाजपकडूनही केले जात आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच ईडीकडून सर्च ऑपरेशनमध्ये अनेक कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली होती.

याच प्रकरणात आता आज मुंबईतील कार्यालयात अनिल परबांनी चौकशीली अजर राहवे असे आदेश देण्यात आले आहे. या रिसॉर्टसाठी केलेला खर्च बेनामी आहे असा संशय संध्या ईडीला आहे. या प्रकरणात ईडीने अनेक जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तसेच यात परब यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

भाजपकडून परबांकडून हल्लाबोल

याच प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार परबांवर हल्लाबोल चढवला आहे. जेलमध्ये जाणारे पुढचे मंत्री हे अनिल परब असतील असा दावा किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मी कोणत्याही चौकशीला समोरे जायला तयार आहे. असे अनिल परब यांनी सांगितलं होतं. तर आता परबांनी न घाबरता चौकशीला जावं, असे आव्हान आता परबांना देण्यात येत आहे. तर मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्यावर दबाब आणण्यासाठी हे भाजपकडून केलंं जातंय. असा आरोप परबांनी केला आहे.

परबांच्या या आरोपांवर पलटवार करताना भाजप नेत्यांनी अनेक कागदपत्र ही ईडीच्या हाती लागल्याचा दावा केला आहे. तसेच परब हे आतापर्यंत कोर्टात का गेले नाहीत? असाही सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.