अनिल परबांच्या अडचणी वाढणार?, दापोलीतील रिसॉर्टची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तशी माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिलीय.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तशी माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिलीय. सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली होती. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Ratnagiri Collector orders to probe Transport Minister Anil Parab’s resort)
‘अनिल परब दापोली साई रिसॉर्ट घोटाळाची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरी जिलाधिकारीनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे’, असं ट्वीट सोमय्या यांनी केलंय. दरम्यान सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी अनिल परब यांच्याबाबत अजून एक मोठं वक्तव्य केलं होतं. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
Police Beating of BJP Activist Nariyelwala at Jalna Inspector Mahajan suspended today, expecting Suspension of DYSP Khiradkar in 2 days. 5 Constable were suspended earlier
जालना भाजपा कार्यकर्ता मारहाण प्रकरणात निरीक्षक महाजन आज निलंबित झाले, DYSP खिरडकर 2 दिवसात निलंबित होणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 1, 2021
दापोलीतीस रिसॉर्टबद्दल सोमय्यांचा आरोप काय?
“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी परब यांच्याविरोधात गंभीर आरोप केला होता.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल कडे ही मी तक्रार केली आहे. pic.twitter.com/0lRONJTFmJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 13, 2021
अनिल परब यांचं उत्तर
किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलं होतं. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणाले होते.
मनसेची कोणत्या पक्षासोबत युती-आघाडी? मनपा निवडणुकीबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा https://t.co/XYX1kXTlUg @RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS @OfficeofUT @Dev_Fadnavis @PawarSpeaks #RajThackeray #MNS #MunicipalCorporationElections #BMC #BJP #Shivsena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या :
अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण
राठोड गेले, देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर; भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे वक्तव्य
Ratnagiri Collector orders to probe Transport Minister Anil Parab’s resort