मोठी बातमी: अनिल परब यांची एवढ्या कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त, ठाकरे गटाला मोठा धक्का
राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडीची मोठी बातमी.अनिल परब यांची एवढ्या कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडीची मोठी बातमी. अनिल परब (Anil Parab) यांची एवढ्या कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort case) ईडीने मनी लॉन्डिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची वारंवार चौकशी झाली. जवळपास चार ते पाच दिवस ही चौकशी झाली होती.
साई रिसॉर्टशी संबंधित दहा कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती मिळतेय. यात साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे.
रत्नागिरीतील केबल व्यावसायिकांचीही चौकशी या प्रकणात करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक, तलाठी यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.
भाजपचे नेते किरीट सोमय्या या प्रकरणावरून आक्रमक होत असल्याचं वारंवार दिसून आलं. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी 31 तारखेला एक ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. नव्या वर्षात या नेत्यांची चौकशी होणार, असल्याचे संकेत दिले होते.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात
ठाकरे परिवाराचे १९ बंगले
अनिल परब
हसन मुश्रीफ
असलम खान चे स्टुडिओ
किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका
मुंबई महापालिका
यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/DLR2ie7z1g
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
किरीट सोमय्या यांच्या या ट्विटनंतर रश्मी ठाकरे यांच्यावर तक्रार देण्यात आली होती. कोरले अलिबाग १९ बंगले घोटाळा. रेवदंडा पोलिस स्टेशन येथे ठाकरे आणि वायकर परिवार यांचा विरोधात, ग्रामपंचायतीची नोंद खोटी, फोर्जरी करणे बेकायदेशीर कृत्ये करणे. म्हणून IPC 415,420,467,468,471 अंतर्गत तक्रार सोमय्या यांनी दाखल केली. त्यानंतर परब यांच्यावर ही कारवाई होत आहे.