आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, अनिल परब यांच्या वक्तव्यानं दापोलीत कदम-दळवी वाद वाढणार?

दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दापोलीच्या नगराध्यक्षपदी ममता मोरे यांची निवड झालीय.

आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, अनिल परब यांच्या वक्तव्यानं दापोलीत कदम-दळवी वाद वाढणार?
अनिल परब
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:58 AM

रत्नागिरी: दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दापोलीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे यांची निवड झालीय. पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत हाच फॉर्म्युला राबिवण्यात येणार असल्याचे सूतोवाच आज अनिल परब (Anil Parab) यांनी केले.दापोली नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना मोठा आनंद झाला आहे. पालकमंत्री अनिल परब यांनी आगामी काळात आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, असं म्हटलं. दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेतृत्व माजी आमदार दळवी यांचेकडेच आगामी काळातही राहील, असे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्याने दापोली मतदार संघात पुन्हा एकदा रामदास कदम (Ramdas Kadam) विरुद्ध सूर्यकांत दळवी असा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दापोलीमध्ये वर्चस्व कुणाचं यासाठी हे दोन्ही नेते चढाओढ करणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी ममता मोरे

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे तर उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेच्या ममता मोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची बनली होती. परंतु, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आघाडीवर ठाम होते , त्यामुळे शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज निरर्थक बनला. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष नगरसेवक यांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु बहुमताच्या जादू आजचा आकडा गाठणे शिवानी खानविलकर यांना शक्य झाले नाही. शिवसेनेकडून व्हीप सुद्धा बजावण्यात आला होता.

शिवसेनेत दोन गट?

शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या तरुण नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी पदार्पणातच पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसून आलं. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे निवडणुकीत शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची आघाडी नगरपंचायत निवडणुकीत झाली आहे. परंतु ही आघाडी विद्यमान आमदार योगेश कदम यांना मान्य नाही. त्यामुळे आमदार समर्थकांनी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. परंतु, नागरिकांनी मात्र आघाडीला स्पष्ट बहुमत दिले.

अडीच वर्षांचा फॉर्म्युला

नगराध्यक्षपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फर्म्युला ठरला असून पहिले अडीच वर्ष नगराध्यक्षपद शिवसेनेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून ममता मोरे यांच्या नावावर नगराध्यक्ष म्हणून एक मताने शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालीद रखांगे यांना उपनगराध्यक्ष पदी विराजमान होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra News Live Update : माघ शुद्ध जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिर फुलांनी सजले

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.