हर्षवर्धन पाटील भाजपात, मुलगी मात्र काँग्रेसमध्येच

हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अंकिता पाटील (Ankita harshvardhan patil ) यांना आता दुहेरी कसरत करावी लागणार आहे. याला अंकिता पाटील (Ankita harshvardhan patil ) कशा पद्धतीनं सामोरे जातात याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

हर्षवर्धन पाटील भाजपात, मुलगी मात्र काँग्रेसमध्येच
Follow us
| Updated on: Sep 11, 2019 | 8:31 PM

बारामती : काँग्रेस नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्याचे संकेत दिले. असं असलं तरी जिल्हा परिषदेची निवडणूक विक्रमी मताधिक्क्याने जिकंलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील (Ankita harshvardhan patil ) या मात्र काँग्रेसमध्येच राहिल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अंकिता पाटील (Ankita harshvardhan patil ) यांना आता दुहेरी कसरत करावी लागणार आहे. याला अंकिता पाटील (Ankita harshvardhan patil ) कशा पद्धतीनं सामोरे जातात याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून होणाऱ्या दगाफटाक्यांमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे काम न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांचं मन वळवलं. पुढे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात एकत्र सभाही झाल्या. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीतही काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना अनपेक्षितपणे तब्बल 71 हजारांचं मताधिक्य मिळालं. त्यामुळे सर्व काही आलबेल झाल्याचं चित्र दिसत होतं.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कन्या अंकिता पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देत त्यांचा राजकारणातील प्रवेश घडवून आणला. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप आणि अन्य पक्षांनी अंकिता पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीत अंकिता पाटील यांनी तब्बल 17 हजारांचं विक्रमी मताधिक्य घेत विजय मिळवला.

दरम्यानच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेची तयारी सुरु केली. जागा वाटपासाठी बैठका होऊ लागल्या. मात्र इंदापूरच्या जागेबाबत कोणताच निर्णय होत नसल्याचं दिसल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत अंकिता पाटील यांची निवड अपेक्षित असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दत्ता झुरंगे यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे काँग्रेसमधूनच हर्षवर्धन पाटील यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होऊ लागल्याचं बोललं जाऊ लागलं. त्याचवेळी राष्ट्रवादीकडूनच अंकिता पाटील यांचा स्थायी समितीतील समावेश थांबला गेल्याचीही चर्चा होऊ लागली.

राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत अस्पष्ट भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबर रोजी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यात भाजप प्रवेशाचा पर्याय पुढे आल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी 10 सप्टेंबरपर्यंत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं. या मेळाव्यात त्यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली. या सर्व घडामोडीनंतर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापरमधून हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी देण्याचे संकेतही दिलेत.

एकूणच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या कन्या अंकिता पाटील या आजही काँग्रेसमध्येच आहेत. दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंकिता पाटील या सक्रिय राजकारणात आलेल्या असल्या तरी मागील काही वर्षांपासून त्या हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता वडिलांच्या भाजप प्रवेशानंतर पुढे काय असा सवाल उपस्थित होत असला तरी त्या सध्या काँग्रेस पक्षातच राहून वडिलांच्या विधानसभा निवडणुकीचं कामकाज पाहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.