अण्णा, मी तुमची माफी मागतो : नवाब मलिक

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांबाबत अखेर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी माफी मागितली आहे. अण्णा हजारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पैसे घेऊन उपोषण करतात, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत, अण्णा हजारेंनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवून, संघाकडून पैसे घेत असल्याचे पुरावे […]

अण्णा, मी तुमची माफी मागतो : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांबाबत अखेर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी माफी मागितली आहे. अण्णा हजारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पैसे घेऊन उपोषण करतात, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत, अण्णा हजारेंनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवून, संघाकडून पैसे घेत असल्याचे पुरावे देण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर नवाब मलिक यांनी नमतं घेत लेखी माफी मागितली आहे.

अण्णा हजारे वडीलधारी व्यक्ती असून, त्यांचे मन दुखावल्याने दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत नवाब मलिक यांनी लेखी माफी मागितली.

नवाब मलिक यांनी अण्णांवर काय आरोप केले होते?

एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांच्यावर गंभीर आरोप केला. नवाब मलिक म्हणाले, “अण्णा हजारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पैसे घेऊन उपोषण करतात.”

अण्णांकडून मलिक यांच्या वक्तव्याची गंभीर दखल

अण्णा हजारे यांनी नवाब मलिक यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत, त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. नवाब मलिक यांना पुरावे देण्याची नोटिशीच्या अण्णांनी मागणी केली होती. तसेच, नोटिशीचा खर्च 50 हजार रुपयेही देण्याची मागणी केली होती.

अजित पवारांकडूनही दिलगिरी व्यक्त

दरम्यान, “अण्णा हजारे यांच्याबद्दल नवाब मलिक यांच्या वक्तव्याची अजित पवारांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. अण्णा समाजसेवक आहेत, त्यामुळे मलिक यांनी असे बोलण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादीची ती भूमिका नाही.” असे म्हणत अजित पवारांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची अण्णांनी भेट नाकारली होती!

30 जानेवारीला अण्णांनी लोकपाल नियुक्तीसाठी राळेगणसिद्धीत उपोषण सुरु केले होते. त्यानंतर राज्यातील विविध पक्षांचे नेते त्यांच्या भेटीगाठी घेत होते. या दरम्यान 31 जानेवारी रोजी अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट नाकारली होती. नावाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या अण्णांनी भेट नाकारली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे अण्णांना भेटायला जाणार होते. मात्र, अण्णांनी भेट नाकारली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.