महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं, शरद पवारांची हाक
महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असं शरद पवार म्हणाले.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असं शरद पवार म्हणाले.
महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. काँग्रेस शिवसेना करत राष्ट्रवादी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविणे जाणार असल्याची शक्यता आहे, मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी विरोध नसला तरी नाराजगी आहे , यावर आज पवार निर्णय घेणार आहेत.
मला ईडीची नोटीस आली, लोकांनी भाजपला येडी ठरवलं
अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.
निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.
VIDEO : शरद पवार यांचं भाषण
शरद पवार काय म्हणाले?
बऱ्याच दिवसानी सोलापूरला आलो. संपूर्ण जगात संकट आले होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाले. शासकीय यंत्रणांना पूर्ण श्रेय दिले पाहिजे.यात खास करुन डॉक्टर नर्स, आरोग्य विभाग यांना श्रेय आहे.
मागील निवडणुकीत अनेक पद घेतलेले लोक पक्ष सोडून गेले. तरुणांना आत्मीवश्वास देणे गरजेचे होते म्हणून मी मागील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मी इथे सभा घेतले.
आता ज्यांच्या हातात सत्ता आहे,त्याचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केले जात आहे.
दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हते. आज केंद्र सरकार काय करतंय
या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस
या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात
मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट
आता सगळ्यात प्रश्न महागाईचा
पेट्रोल आणि डिझेल चे दर वाढत आहेत
यामुळे सगळ्याच गोष्टी महाग होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास
भाजपचे सरकारची महागाईला निमंत्रण देणारी नीती
वेळप्रसंगी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार
शेतकऱ्यांची केंद्र सरकारला आस्था नाही
शांततेत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या नेत्यांनी गाडी घातली
या सगळ्यांची माहिती सुप्रीम कोर्टाने मागितली आहे
हत्या करणाऱ्याचे पाप या सरकारवर आहे
शेतकऱ्यांची हत्या करून पाप करणाऱ्या भाजपचा निषेध म्हणून भाजप सोडून येत्या 11 तारखेला महाराष्ट्र बंद करण्याचे शरद पवारांचे आवाहन
महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, तरुण कार्यकर्त्याना विसरू नको, तरुण नेत्यांना संधी द्या, 50 टक्के महिला, तरुण कार्यकर्ते, ओबीसी,आणि मागासवर्गीय लोकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करूया
ही निवडणूक सोलापूरच नकाशा बदलण्यासाठी