एका रात्रीत मराठा समाजातील उमेद्वारांचे नशीब बदलले आणि… शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार

मराठा आरक्षण स्थगित झाल्यामुळे MSEB मधील 2014 आणि 2019 मधील मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. यामध्ये ESBC आणि SEBC तसेच इतर घटकातील उमेद्वारांचा समावेश होता.

एका रात्रीत मराठा समाजातील उमेद्वारांचे नशीब बदलले आणि... शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 5:07 PM

सोलापूर : राज्यातील महावितरण विद्युत सहाय्यक पदभरतीमधील मराठा समाजातील उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.  सोलापूरमधील 102 उमेदवारांना त्यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. महावितरणने रात्रभर कागदपत्रांची छाननी करुन नियुक्तीपत्रके दिली आहे. सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे मानले आभार मानले आहेत. मराठा समाजातील ESBC आणि SEBC तसेच इतर घटकातील या नियुक्त्या रखडलेल्या होत्या.

मराठा आरक्षण स्थगित झाल्यामुळे MSEB मधील 2014 आणि 2019 मधील मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. यामध्ये ESBC आणि SEBC तसेच इतर घटकातील उमेद्वारांचा समावेश होता.

यादीतील कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र उमेदवारांना कायदेशीर त्रुटी दूर करून त्वरित नियुक्त्या द्याव्या अशी मागणी उमेदवारांनी केली होती.

शिंदे-फडणवीस सरकारने या नियुक्त्या करण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी रात्रभर जागून MSEB ने कागदपत्रांची छाननी करुन या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले.

रखडलेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचे विधेयक शिंदे सरकारच्या काळात संमत करण्यात आले होते. या सर्व उमेदवारांना नियुक्त्या देण्यासाठीचा शासन निर्णय (GR) निघाला.

समाजातील तरुणांची हरवलेली भाकरी परत देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असे म्हणत सकल मराठा समाजाच्या प्रतिनीधींनी आभार मानले आहेत.

नियुक्तीपत्रके मिळालेल्या उमेद्वारांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांना अभिवादन केले. मिठाई वाटून त्यांनी आपला जल्लोष साजरा केला.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....