Chhagan Bhujbal : राज्यातील सत्तासंघर्षावर काही दिवस युक्तिवाद सुरूच राहील, छगन भुजबळ म्हणाले, निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो

एकूण निकालवर दोन्ही पक्ष आशावादी आहेत. त्यामुळे नक्की काय निकाल येईल हे सांगता येत नाही, असंही ते म्हणाले. मी कोर्टातील आजपर्यंतचे सर्व युक्तिवाद ऐकले आहेत. उद्या हरीश साळवे यांना लेखी प्रश्न मांडायला सांगितलं आहे.

Chhagan Bhujbal : राज्यातील सत्तासंघर्षावर काही दिवस युक्तिवाद सुरूच राहील, छगन भुजबळ म्हणाले, निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो
छगन भुजबळ म्हणाले, निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतोImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 5:06 PM

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर (Power Struggle) पुढील काही दिवस युक्तिवाद सुरूच राहील, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निकाल नेमका कोणाच्या बाजूनं लागेल काही सांगता येत नाही, असंही भुजबळ म्हणाले. कोर्टाच चाललेले सगळे युक्तिवाद आजच्यासह पूर्ण युक्तिवाद ऐकलेले आहेत. मला असं वाटतं की, आजखी काही दिवस ही चर्चा सुरू राहील. परंतु, न्यायाचा तराजू कुठे जाईल काही सांगता येणार नसल्याचं ते म्हणाले. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पटलावर पहिलीच केस घेतली जाईल. उद्या सकाळपासून पुन्हा एकदा दोन्ही गटाचे वकील आपआपल्या मुद्यांवर युक्तिवाद करतील. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ

ईडीचा गैरवापर होतोय

ईडीच्या कचाट्यात माजी मंत्री छगन भुजबळ सापडले होते. त्यावेळी ते काही दिवस कैदेतही होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केली. त्यानिमित्त छगन भुजबळ यांनी आपल्याला आलेला ईडीचा अनुभव सांगितला. भुजबळ म्हणाले, ज्यावेळी मी ईडीच्या कचाट्यात सापडलो होतो. त्यावेळी ईडी काय आहे हे माहीत नव्हते. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळत नाही. त्यामुळे आपली बाजू मांडता येत नाही. मला वाटते ईडीचा गैरवापर होत आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या हरीश साळवेंना लेखी प्रश्न मांडायला सांगितलं

एकूण निकालवर दोन्ही पक्ष आशावादी आहेत. त्यामुळे नक्की काय निकाल येईल हे सांगता येत नाही, असंही ते म्हणाले. मी कोर्टातील आजपर्यंतचे सर्व युक्तिवाद ऐकले आहेत. उद्या हरीश साळवे यांना लेखी प्रश्न मांडायला सांगितलं आहे. मला वाटते आणखी काही दिवस कोर्टातील युक्तिवाद सुरूच राहील. नेमका कोणाच्या बाजूनं निकाल लागेल, हे सांगता येत नाही.

पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची एकत्रित भेट घेतली. राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पत्र दिले, असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.