…तर तमाशात जा! सध्या सुरू असलेल्या राजकारणावर अर्जुन खोतकरांचा संताप, नेत्यांना सुनावले खडेबोल
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून नाराजी व्यक्त करत सर्वच पक्षांना संयमाचा सल्ला दिला आहे.
जालना : शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjan Khotkar) यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून नाराजी व्यक्त करत सर्वच पक्षांना संयमाचा (Patience) सल्ला दिला आहे. मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे, मात्र असं राजकारण मी कधी पाहिलं नाही. गेल्या 40 वर्षांत देश, राज्यपातळीवरच्या नेतृत्वावर, मुख्यमंत्र्यांवर (CM), पंतप्रधानांवर, पक्षप्रमुखांवर अशी टीका मी कधी ऐकली नाही. राजकारणाचा स्तर गेल्या काही दिवसांपासून खालवत चालला आहे. राजकारणात संयम आवश्यक आहे, ज्यांना ज्यांना वरिष्ठ राजकारण्यांवर टीका टिप्पणी करायची आहे, त्यांनी तमाशात जावं असे खडेबोल अर्जुन खोतकर यांनी सुनावले आहेत.
अर्जुन खोतकर नेमकं काय म्हणाले?
सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून अर्जुन खोतकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे, मात्र असं राजकारण मी कधी पाहिलं नाही. सध्या पंतप्रधान, मुख्यमंत्री, पक्षाचे प्रमुख यांच्यावर टोकाची टीका सुरू आहे. त्यांना जो त्रास झाला तो त्रास इतरांना देण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? असा सवाल अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांना कोणी बोललं म्हणून तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकता, आणि तुम्ही त्यांची मिमिक्री करता असं म्हणत त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
राजाकारणात संयम आवश्यक
दरम्यान यावेळी बोलताना अर्जुन खोतकर यांनी संयमाचा देखील सल्ला दिला आहे. राजकारणात संयम आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणाचा स्तर खालवत आहे. ज्यांना वरिष्ठ राजकारण्यांवर टीका टिप्पणी करायची आहे त्यांनी तमाशात जावं, नाटकात काम करावं काहीही करावं असं खोतकर यांनी म्हटलं आहे.