उद्धव ठाकरे, राऊतांशी सकाळीच बोललो, उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला अडचण असेल तर निर्णय घ्या: अर्जुन खोतकर

Arjun Khotkar : अर्जुन खोतकर शिंदे गटात

उद्धव ठाकरे, राऊतांशी सकाळीच बोललो, उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला अडचण असेल तर निर्णय घ्या: अर्जुन खोतकर
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 11:56 AM

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar )हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. आता त्यांनी स्वत: आपण शिंदेगटाला (Eknath Shinde) समर्थन देत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी ते भावून झाल्याचं पाहायला मिळालं. रडत-रडत त्यांनी आपली भूमिका मांडली. “उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) बोलणं झालं. सकाळी सविस्तर बोललो. माझ्यावर जी परिस्थिती बितत आहे ते सांगितलं. मी त्यांच्या कानावर सर्व गोष्टी टाकल्या. राऊत विनोद घोसाळकर यांच्याशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे.  40 वर्षापासून. घरी आल्यावर परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करण गरजेचं आहे. मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली. त्या संदर्भात जे काही बोलायचं ते बोलले. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तरी परिस्थिती आहे म्हणून मी निर्णय घेतला आहे, असं म्हणत अर्जुन खोतकरांनी इथून पुढे आपण शिंदेगटाचा भाग असणार असल्याचं जाहीर केलं.

मी केवळ सहारा शोधला- खोतकर

मी आधी चारवेळा त्यांना फोन केला. व्हॉट्सअप कॉलवरून बोललो. ईडीची पिडा जाईल हे मी कसं सांगू शकतो. मी सहारा शोधला. थोडाफार तरी सहारा मिळेल.

दानवेंविषयी काय म्हणाले?

“रावसाहेब दानवेंनी मला चहा घ्यायला बोलावलं. अडीच वर्षाने त्यांनी मला बोलावलं. ते म्हणाले अर्जुनराव काय करताय. मी म्हटलं मला लोकसभा लढवायची आहे. ते म्हणाले, सोडता येणार नाही ती जागा आमची आहे. मी म्हणालो हा निर्णय शिंदे फडणवीसांवर सोडा. आता हा शिंदे फडणवीसांकडे निर्णय आहे. मी आग्रह सोडला नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“…तर मातोश्रीवरही जाईल”

“विधान परिषद वगैरे मी अट ठेवली नाही. ही अफवा असेल मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असं सांगितलं नाही. मी उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलणार नाही. 40 वर्ष मी पक्षात काम केलं आहे. मी उपनेते पदाचा राजीनामा देणार. मेसेज टाकला आहे. एखाद्या प्रसंगाने भेटायची वेळ आली तर मातोश्रीवरही जाईल”, असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय.

“आम्ही आयएमससाठी अर्ज केला. रजिस्ट्रेशनसाठी. रजिस्ट्रेशन मिळालं. २०१४ला आमचं नाव लागलं. नंतर ५०० ते ६०० कर्मचारी कोर्टात गेले. दावे दाखल केले. नंतर दुष्काळ पडला. त्यामुळे कारखाने सुरू झाला नाही. २०१९मध्ये वसंतदादा शुगरकडून डीपीआर करून घेतला. नंतर कोरोनामुळे कारखाना बंद राहिला. मी दिवाळी कार्यक्रमात कारखाना सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर या प्रश्नाला वेगळं वळण लागलं. प्रकरण कोर्टात आहे. काही कारवायांमुळे कारखाना सुरू केला नाही. त्याचं शल्य आहे”, असंही खोतकर म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.