Arjun Khotkar : अर्जुन खोतकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवड, विजय नाहटा विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. तेव्हापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असलेल्या पाहायला मिळतं आहे.
मुंबई – महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात मागच्या काही दिवसांपासून अत्यंत जलदगतीने घडामोडी घडत आहेत. तसेच रोज नव्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेत रोज नव्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने सद्या शिवसेनेत अनेक नवीन घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक आमदारांनी आपला वेगळा गट केल्यामुळे शिवसेनेत (Shivsena) नव्या नेत्यांना संधी देण्याचे काम चालू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे माहिती पत्रकात दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत अनेक नेत्यांनी वरीष्ठ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
बंड केल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. तेव्हापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असलेल्या पाहायला मिळतं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यामागून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची रांग लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी सुरु केल्या आहे. गेलेल्यांना जाऊ द्या, आपण आपली नव्याने सुरुवात करु अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे शिंदे गटात सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनी पदावरुन हटवण्याचे काम सध्या जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी
अर्जुन खोतकर यांच्या विश्वास असल्याने त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत ते महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. तर विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पत्रकातून देण्यात आली आहे. दोघांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातल्या अनेक विश्वासू कार्यकर्त्यांच्या वर्णी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.