ARMC Election 2022 : अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी, वॉर्ड क्रमांक 27 कुणाचा?

| Updated on: Aug 07, 2022 | 4:30 PM

ARMC Election 2022 : त्यामुळे सहाजिकच एवढ्या जागा वाढल्याने सर्व सत्ता समीकरणे हलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा महानगरपालिका निवडणुकीचा पेपर कुणासाठी सोपा नसणार आहे, सर्वांनाच अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. 

ARMC Election 2022 : अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी, वॉर्ड क्रमांक 27 कुणाचा?
अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी, वॉर्ड क्रमांक 27 कुणाचा?
Image Credit source: tv9
Follow us on

अमरावती : राज्यात सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने मैदानात उतरले आहेत. काही महिने आधीच या निवडणुकीसाठी राजकीय गोटात प्लॅनिंग चाललं होतं. कोणती महानगरपालिका आपल्या ताब्यात कशी आणता येईल त्यासाठी बड्या नेत्यांच्या भेटीगाठी बैठका, तसेच त्या जिल्ह्यात दौरे वाढलेले पाहायला मिळाले. अमरावती महानगरपालिकेचे (ARMC Election 2022) चित्र बघितलं तर यावेळेस पूर्णपणे वेगळं असणार आहे. कारण मागच्या वेळी या ठिकाणी वार्डची (Ward 27) संख्या कमी होती ती आता 33 वरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे सहाजिकच एवढ्या जागा वाढल्याने सर्व सत्ता समीकरणे हलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा महानगरपालिका निवडणुकीचा पेपर कुणासाठी सोपा नसणार आहे, सर्वांनाच अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

पहिल्यांदाच हा वॉर्ड तयार

अमरावती महानगरपालिकेचा वार्ड 27 यावेळी पहिल्यांदाच तयार झाला आहे. त्यामुळे सर्वांसाठीच ही परीक्षा नवी असणार आहे. सर्व पक्षांचे उमेदवार या वार्ड मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्याने त्यांना मतदारांचा परिचय यापासून ते इतर सर्व बाबींची काळजी घ्यावी लागणार आहे. अमरावतीतली राजकीय समीकरणे पाहिली तरी या ठिकाणी शिवसेना भाजप आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची ताकद या ठिकाणी दिसून येते. गेल्यावेळी हे महानगरपालिका भाजपच्या ताब्यात होती. मात्र राणा दाम्पत्य या वेळेस ही महापालिका भाजपच्या ताब्यातून काढून घेण्याचा तसेच इतर राजकीय पक्ष या ठिकाणी जोर लावताना दिसून येतील, तसेच याचे दुसरे समीकरण पाहिलं तर राणा दाम्पत्य आणि भाजप एकत्र ही निवडणूक लढू शकतात, त्यामुळे त्यांची ताकद चांगलीच वाढू शकते.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डची लोकसंख्या किती आहे?

या वॉर्डची आकडेवारी पाहिल्यास आपल्या लक्षात काही समीकरणे येऊ शकतात. या वार्ड ची एकूण लोकसंख्या 21,105 आहे. तर यात अनुसूचित जातीचे दहा हजार 344 मतदार आहेत. तसेच अनुसूचित जमातीचे 619 मतदार आहेत. त्यामुळे लोकसंख्येचे प्रमाण ही येणाऱ्या निवडणुकीत बराच फरक पाडू शकत.

पक्ष उमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डची व्यप्ती

मंगलधाम कॉलनी, यशोदा नगर नं २. संजय गांधी नगर नं. २ उत्तम नगर, शांती निकेतन कॉलनी, मिमटेकडी परिसर, प्रभु कॉलनी, महात्माफुले नगर, चैतन्य कॉलनी, अमर कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, ग्रेटर कैलास नगर, महादेव खोरी परिसर, गौतम नगर व इत्यादी, अशी या वॉर्डची व्याप्ती असणार आहे.