निवडणुकीपूर्वीच भाजपने खातं उघडलं, तिसऱ्या जागेवरही बिनविरोध निवड

इटानगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपचे तीन उमेदवार विजय झाले आहेत. दोन विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील दिरांग मतदारसंघातून भाजपचा तिसराही उमेदवार विजयी झाल्याचं भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव […]

निवडणुकीपूर्वीच भाजपने खातं उघडलं, तिसऱ्या जागेवरही बिनविरोध निवड
BJP
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

इटानगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपचे तीन उमेदवार विजय झाले आहेत. दोन विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील दिरांग मतदारसंघातून भाजपचा तिसराही उमेदवार विजयी झाल्याचं भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांनी म्हटलंय.

यापूर्वी दुसरी जागा जिंकल्याची माहिती राम माधव यांनी मंगळवारी दिली होती. सर केंटो जिनी आलो पूर्व विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले होते. शिवाय इंजिनीअर ताबा तेदिव हे देखील येचुली विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याने भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलंय.

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही होत आहे. इथे लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या 60 जागा आहेत. सध्या भाजपचीच सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेशात 11 एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होईल. पेमा खांडू सध्या अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलो पूर्व विधानसभेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. छाननीनंतर काँग्रेसचे उमेदवार मिनकिर लोलेन यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यामुळे केंटो जिनी यांचाच एकमेव वैध अर्ज आहे. 28 मार्चच्या नंतरच या उमेदवारांनी विजयी घोषित केलं जाईल, कारण 28 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

भाजप अरुणाचल प्रदेशातील सर्वच्या सर्व 60 जागांवर निवडणूक लढत आहे. पण निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला होता. कारण, भाजपच्या तब्बल 20 नेत्यांनी एनपीपी या पक्षात प्रवेश केला होता, ज्यात दोन मंत्री आणि सहा आमदारांचाही समावेश आहे. काँग्रेसनेही इथे जोर लावला आहे. अरुणाचलमधील प्रादेशिक पक्ष एनपीपी 33 जागांवर, जेडीएस 18 आणि जेडीयू 13 जागांवर निवडणूक लढवत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.