अरविंद केजरीवालांवर हल्ला, मिरची पूड फेकली, चष्मा तुटला
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्ली सचिवालयातून बाहेर येताना केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकण्यात आली. मिरची पावडर फेकणाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं. मात्र सर्व झटापटीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. अनिल शर्मा असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. हल्लेखोराने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिली. अनिल शर्माने नेमकं हा हल्ला का […]
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्ली सचिवालयातून बाहेर येताना केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकण्यात आली. मिरची पावडर फेकणाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं. मात्र सर्व झटापटीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला.
अनिल शर्मा असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. हल्लेखोराने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिली.
अनिल शर्माने नेमकं हा हल्ला का केला, तो कुठला रहिवासी आहे, तो इतक्या तयारीने मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
#WATCH: CCTV visuals of the incident that took place at Delhi’s Central Secretariat where chilli powder fell from a man’s hand. He had come to meet Delhi CM Arvind Kejriwal with his grievances. Investigation underway whether it was an attack or powder fell unintentionally pic.twitter.com/OlRrScpmC2
— ANI (@ANI) November 20, 2018
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर हा पहिलाच हल्ला झाला आहे असं नाही. यापूर्वी केजरीवाल यांच्यावर शाईफेक झाली होती.
यापूर्वी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली इथं एकाने थप्पड मारली होती. या हल्ल्यानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी त्या हल्लेखोराला मारहाण केली होती.
तर 28 मार्च 2014 रोजी हरियाणातील प्रचार सभेतही एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला होता. मी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा कार्यकर्ता असल्याचे या व्यक्तीने त्यावेळी म्हटलं होतं. वाराणसीमध्येही केजरीवाल यांच्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता.