Arvind Sawant : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणं पुण्यकर्म? चार महिने थांबे चित्र स्पष्ट होईल, अरविंद सावंतांचा इशारा

चार महिने थांबा चित्र स्पष्ट होईल, असा थेट इशाराच अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी एकनाथ शिंदे यांना देऊन टाकला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने खोचक सवाल ही केला आहे.

Arvind Sawant : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणं पुण्यकर्म? चार महिने थांबे चित्र स्पष्ट होईल, अरविंद सावंतांचा इशारा
खा. अरविंद सावंतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 5:45 PM

नवी दिल्ली : आधी ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) सत्तेत असताना भाजपकडून वारंवार सरकार पडण्याचे संकेत दिल्या जायचे. तसेच रोज नव्या तारखाही दिल्या जायच्या. मात्र ही तारीख खरी ठरायला अडीच वर्ष उलटली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानेच हे सरकार पडलं आणि राज्यात नवे सरकार अस्तित्वात आलं. मात्र आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या नव्या सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे पुन्हा तीच स्थिती तयार होणार का असा सवाल राजकीय चर्चा वर्तुळात विचारला जाऊ लागलाय. चार महिने थांबा चित्र स्पष्ट होईल, असा थेट इशाराच अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी एकनाथ शिंदे यांना देऊन टाकला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने खोचक सवाल ही केला आहे.

उद्धव ठाकरेंना हटवणं पुण्यकर्म होतं?

अरविंद सावंत हे नव्या सरकार बद्दल बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं आहे. मात्र त्याला आता जनता कंटाळली आहे. उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवलं हे पुण्य कर्म आहे का? असा थेट सवाल अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच बाळासाहेबांचा विचार हा सांगण्यासाठी आहे, आचरणात आणला जात नाही. असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे. तर दुसरीकडे चार महिने थांबा आता चार महिन्यात चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत त्यांनी पुढचे राजकीय संकेत ही दिले आहेत. असेच इशारे ठाकरे सरकारला भाजपकडून दिले जात होते. आता अरविंद सावंत यांचा हा इशारा किती खरा ठरणार हेही येणारे चार महिने सांगतीलच.

शिवसेना विधेयकाला विरोध करणार

तर दुसरीकडे लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दिल्लीतल्या या अधिवेशनात तुफान राजकीय घमासान सुरू आहे. संसदेत बँकांच्या खाजगीकरणाचे विधेयक आणले जाणार का? असा सवाल अरविंद सावंत यांना विचारला गेला. यावेळी शिवसेनेचे खासदार या विधेयकाला विरोध करणार असे अरविंद सावंत यांनी बजावले. तसेच ज्या बँका सर्वसामान्यांसाठी लाभ करून देतात त्यांचे खाजगीकरण कशासाठी? असा सवाल ही अरविंद सावंत यांनी मोदी सरकारला केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप याच मुद्द्यावरून आमने सामने येताना दिसून येत आहे. त्यामुळे संसदेचं अधिवेशन हे वादळी ठरणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.