त्यांनी मैदान जिंकलं, तुम्ही मैदान सोडून पळाले, एकनाथ शिंदेंना थेट आहेर कुणाचा?

नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वाद सध्या विकोपाला गेलाय. यावर अरविंद सावंतांनी बोलणं टाळलं. संपलेल्या लोकांबद्दल काय बोलायचं, असा टोला अरविंद सावंतांनी दिला.

त्यांनी मैदान जिंकलं, तुम्ही मैदान सोडून पळाले, एकनाथ शिंदेंना थेट आहेर कुणाचा?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 2:51 PM

मुंबईः कालच्या भारत – पाकिस्तान (India-Pakistan) क्रिकेट मॅचवरून संपूर्ण भारतात दिवाळीच्या एक दिवस आधीच जल्लोष साजरा झाला. ठिकठिकाणी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा झाला. यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आज तुफान टोलेबाजी केली. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली तशीच मॅच आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकली असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं.यावरून शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सणकून टीका केली आहे.

आपली तुलना भारताच्या खेळाडूंशी करायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांनी मॅच जिंकून देशाचा गौरव वाढवला. तुम्ही गद्दारी केली… अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

या गद्दारीचा तुम्हाला अभिमान वाटतो. ते मैदानात खेळले. मैदानात जिंकले. तुमच्यासारखे मैदान सोडून पळाले नाहीत, अशी खोचक टीका अरविंद सावंतांनी केली.

उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. यावरून नवनीत राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे शेतावर नाही तर बांधापर्यंत पोहोचले. तिथेच पत्रकार परिषद घेतली, असं राणा म्हणाल्या. त्यावर अरविंद सावंतांनी संताप व्यक्त केला. लायकी नसलेल्या माणसानं न बोलणं बरं आहे. उद्धव साहेबांचं नाव घ्यायची त्यांची लायकी नाही, असं सावंत म्हणाले.

रामदास कदम यांच्यासह अनेक भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा दौरा नाटकी असल्याची टीका केलीय. यावर अरविंद सावंत म्हणाले, ‘ भाजपा आयुष्य भर नौटंकी करत आहे. .. देशात नौटंकी भाजपाने पेरली आहे. आम्हाला जमत नाही… आम्ही बाळासाहेबांचे शिव सैनिक आहोत. आम्ही नौटंकी करत नाही…

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले, ‘ दोन वर्ष कोरोना होता. पंतप्रधानांनी काय केलं? लॉक डाऊन कोणी जाहीर केलं? उद्धवजींनी सर्व धर्मांसाठी केलं होतं.. फक्त एकासाठी नाही. फक्त मंदिर बंद न होता मशीद चर्च सर्वकाही बंद होता… पण भाजपने फक्त भ्रम निर्माण करायचे प्रयत्न केले.

नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वाद सध्या विकोपाला गेलाय. यावर अरविंद सावंतांनी बोलणं टाळलं. संपलेल्या लोकांबद्दल काय बोलायचं, असा टोला अरविंद सावंतांनी दिला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.