Arvind Sawant: “हे कसले राम, हे तर हराम!” युवा आमदाराच्या ट्विटवरून अरविंद सावंत भाजपवर बरसले…

Devendra Fadnavis: युवा आमदाराच्या ट्विटवरून अरविंद सावंत भाजपवर बरसले. रामाच्या मुद्द्यावरून घेरलं.

Arvind Sawant: हे कसले राम, हे तर हराम! युवा आमदाराच्या ट्विटवरून अरविंद सावंत भाजपवर बरसले...
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 8:40 AM

मुंबई : भाजपच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. प्रभू राम तर भाजपच्या आस्थेचा विषय… रामाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमकतेने बोलतं. शिवसेनाही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करते. पण सध्या ‘रामा’च्या मुद्द्यावरून भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं ‘रामा’च्या मुद्द्यावरून घेरलंय. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी एक ट्विट करत भाजपला सवाल केलाय. भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी एक ट्विट केलं होतं. त्याच्या आधारे सावंतांनी भाजपवर निशाणा साधलाय. हे कसले राम हे तर हराम!, असं म्हणत त्यांनी जहरी टीका केली आहे. शिवाय भाजपचेच आमदार जर अशी असभ्य भाषा वापरणार असतील तर त्यांनी रामराज्याची भाषा करू नये, असंही ते म्हणालेत. राम सातपुतेंच्या (Ram Satpute) भाषेवर सावंत यांनी आक्षेप घेतलाय.

नेमकं काय घडलं?

भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी एक ट्विट केलं. आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा, असं ट्विट राम यांनी केलं होतं. त्यांनी हे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. त्यावर अरविंद सावंत यांनी आक्षेप घेतलाय.

हे सुद्धा वाचा

सावंतांचा आक्षेप

“कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे सदस्य का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीयचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकारात. हे कसले राम, हे तर हराम. त्यांच्यावर शोध करून शोधणे आहेत देवेंद्र फडणवीसजी रामराज्याची भाषा करू नका”, असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे.

भाजप आणि रामराज्य!

भाजपच्या राजकारणात प्रभूरामाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदुत्व, राम, अयोध्या, रामराज्य यासारख्या मुद्द्यांवर भाजप आक्रमकपणे आपली भूमिका मांडतं. अयोध्येत रामाचं मंदीर होणं हे भाजपच्या राजकीय वाटचालीतील महत्वाचा टप्पा होता. पण आता ‘रामा’च्या मुद्द्यावरूनच भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.