सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, अरविंद सावंत यांची माहिती

शिंदेगटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, अरविंद सावंत यांची माहिती
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 2:57 PM

मुंबई : शिंदेगटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिलीय.

खासदार अरविंद सावंत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात दादर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. तेव्हा सदा सरवणकर यांनी गोळीबार केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच हाणामार झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा एक्सक्लुझिव्ह tv9 च्या हाती लागलाय.

याप्रकरणी फिर्याद दिलेले संतोष तेलवणे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?”, असं संतोष तेलवणे म्हणालेत.काल रात्री झालेली मारहाण कश्यामुळे झाली? यावरही संतोष तेलवणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली,असं संतोष तेलवणे यांनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.