Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या!”, अरविंद सावंत आक्रमक

अरविंद सावंत यांनी प्रसाद लाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिलीय...

कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या!, अरविंद सावंत आक्रमक
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 3:13 PM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते वारंवार शिवरायांचा अपमान करत आहेत. कुठल्या शब्दात संताप व्यक्त करावा कळत नाहीये. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या!, असा संताप सावंत (Arvind Sawant) यांनी व्यक्त केलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि देशभरातील लोकांच्या मनात प्रेम, आदर आणि अस्मिता आहे. त्यांच्याबाबत एकही अवाक्षक खपवून घेणार नाही, असं अरविंद सावंत म्हणालेत.

भाजपवाल्यांना इतिहास नरेंद्र मोदींचा तयार करायचा आहे. यांचा स्वातंत्र्यलढाशी देखील संबंध नाही.सत्ता पैसा आणि माज एवढंच यांना कळतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाडपर्यंत या सगळ्यांना हाकलून दिलं पाहिजे, असं सावंत म्हणालेत.

प्रसाद लाड यांचं वक्तव्य

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या अशी माणसं महाराष्ट्राला कलंक आहेत. हे लोक इतके घाणेरडे आहेत त्यांना इतिहासाची जाणीव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांनी कधी वाचन केलेलं नाही. लिखाण केलेलं नाही, तरी हे लिहितात छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद भाजप के… या भाजपला साथ लाथ मारून हाकलून दिला पाहिजे, असं अरविंद सावंत म्हणालेत.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.