‘ते’ चिन्ह आधी का डिक्लेअर केलं नाही? आमचं लीक केलं.. शिवसेनेचा वाद आणखी पेटणार?
उद्धव ठाकरे गटाकून उगवता सूर्य, त्रिशूळ आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह काल पर्याय म्हणून ठेवण्यात आली. तर आज शिंदे गटानेही उगवात सूर्य आणि त्रिशूळ या दोन चिन्हांचा पर्याय दिल्याची माहिती समोरी आली आहे.
मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धनुष्यबाण चिन्हाऐवजी ज्या तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) ठेवला, त्यापैकी दोन पर्यायांवर पुन्हा एकदा शिंदे गटाने (Eknath Shinde) दावा ठोकलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटासमोर आणखी पेच निर्माण झालाय. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काल उद्धव ठाकरे गटाचे पक्षचिन्हाचे पर्याय लिक करण्यात आले, मात्र शिंदे गटाचे पर्याय डिक्लेअर का केले नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारलाय.
उद्धव ठाकरे गटाकून उगवता सूर्य, त्रिशूळ आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह काल पर्याय म्हणून ठेवण्यात आली. तर आज शिंदे गटानेही उगवात सूर्य आणि त्रिशूळ या दोन चिन्हांचा पर्याय दिल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार, या लोकांनी विलीनीकरण करायला हवं. मात्र ते तसं करत नाहीयेत. हे सर्व कारस्थान भाजपची महाशक्ती करतेय. केंद्रीय यंत्रणा वेठबिगारी झाल्यात, असा आरोप अरविंद सावंत यांनी केलाय.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात गेलो. आम्ही जे सिम्बॉल दिले तेच त्यांनी मागितले. निवडणूक आयोग किती बायस आहे, हेच यावरून कळते, असं सावंत म्हणाले.
पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, ‘ हा खेळ खंडोबा मांडलाय…………… त्य़ांनी दिलेलं चिन्हं तुम्ही डिक्लेर का केलं नाही? आम्ही दिलेले लीक केलं.. जे कुणी नोटरी आहेत ना त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा, अशी मागणी अरविंद सावंतांनी केली आहे.
शिवसेनेच्या वाटेत तुम्ही कितीही आम्हाला आडवा, पण महाराष्ट्रातील लोकं चिडलेले आहेत, हे लक्षात ठेवा, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिलाय.