श्रोते सहा तास वाट बघत बसले, ओवेसी सहा मिनिटांत भाषण उरकून निघाले
असदुद्दीन ओवेसी यांची शनिवारी सकाळी 11 वाजता अकोला (Asaduddin Owaisi Akola Rally) येथे सभा घेणार होते. परंतु, या सभेला ते तब्बल सहा तास उशिरा आले. भर उन्हात नागरिक त्यांना ऐकण्यासाठी सहा तास सभा ठिकाणी थांबून होते. मात्र, ओवेसी यांनी अवघ्या सहा मिनिटांचं भाषण करुन निघून गेल्याने दिवसभर वाट बघणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला.
अकोला : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता अकोला (Asaduddin Owaisi Akola Rally) येथे सभा घेणार होते. परंतु, या सभेला ते तब्बल सहा तास उशिरा आले. भर उन्हात नागरिक त्यांना ऐकण्यासाठी सहा तास सभा ठिकाणी थांबून होते. मात्र, ओवेसी हे अवघ्या सहा मिनिटं भाषण करुन निघून गेल्याने दिवसभर वाट बघणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला (Asaduddin Owaisi Akola Rally).
एमआयएमचे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. रेहमान खान यांच्या प्रचार सभेसाठी असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. शनिवारी ही सभा सकाळी 11 वाजता होती. नागपूर येथे ओवेसी वेळेत पोहोचले. पण, तिथे त्यांचं हेलिकॉप्टर उशिरा पोहोचल्याने ते बाळापूर येथील सभेच्या ठिकाणी 3.50 वाजता पोहोचले. सभास्थळी येताच त्यांनी गर्दी बघत थेट माईक हातात घेतला आणि भाषणाला सुरुवात केली.
त्यानंतर अवघी सहा मिनिटं त्यांनी भाषण केलं. अवघ्या सहा मिनिटांत ते निघून गेल्याने, सहा तास ताटकळत त्यांची वाट पाहाणाऱ्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. तरीही त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
देशातील परिस्थिती बदलण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. या परिस्थितीला आव्हान देण्यासाठी सक्षम होण्याची गरज आहे, असं त्यांच्या सहा मिनिटांच्या भाषणात ओवेसी म्हणाले.
संंबंधित बातम्या :
हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करण्याचं जाहीरनाम्यात सांगा, मोदींचं विरोधकांना आवाहन
ना कोटी, ना लाख, अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती?
एकच उल्हास, बाकी सब खल्लास, धैर्यशील माने यांचं खणखणीत भाषण
वर्धा-नागपूर अंतर अर्ध्यावर, गडकरींकडून ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा