BREAKING NEWS | उद्धव ठाकरेंवर आणखी एक संकट, दिल्ली लीकर घोटाळ्याचं कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? केजरीवाल-ठाकरे भेटीत काय घडलं? भाजपचा संशय काय?

उद्धवजींचं सरकार त्या वेळेला मद्यविक्रेत्यांना ज्या खैराती वाटत होतं, त्यांचीही चौकशी होणार का, अशा शंका उपस्थित होत आहेत. त्या दिशेने चौकशी होऊ शकते, असे सूतोवाच आशिष शेलार यांनी केले. 

BREAKING NEWS | उद्धव ठाकरेंवर आणखी एक संकट, दिल्ली लीकर घोटाळ्याचं कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? केजरीवाल-ठाकरे भेटीत काय घडलं? भाजपचा संशय काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 10:03 AM

मुंबई : चहुबाजूंनी संकटांनी घेरलेल्या उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. किंबहुना या संकटाची ग्वाहीच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. या भेटीत नेमकं काय घडलं, याचं कनेक्शन आगामी काळातील रणनीतीनुसार दिसून येईल. मात्र या भेटीत काय घडलं असेल, याचा भाजपने काढलेला अंदाज खरा ठरला तर उद्धव ठाकरेंना धक्का देणारी ही बातमी आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधातील कथित दारू घोटाळ्याचं कनेक्शन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारपर्यंत आहे का, असा संशय व्यक्त होतोय, सीबीआय कधीही या अँगलने चौकशी करू शकते, असं सूतोवाच आशिष शेलार यांनी केलंय..

भाजपचा संशय काय?

दिल्ली सरकारच्या मद्यविक्री धोरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर आहे. या आरोपांखाली सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सिसोदिया यांच्या कोण-कोणत्या मद्यसम्राटांबरोबर लागेबांधे आहेत, याची तपासणी सीबीआय करत आहे. हा तपास करताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सीबीआयचे अधिकारी येऊ शकतात, असा संशय आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. कारण दिल्लीत कथित घोटाळा उघड झाला, त्याच वेळी महाविकास आघाडी सरकारने मद्यविक्री अधिक सुलभ होण्यासाठी नवं मद्यधोरण आणलं होतं..

आशिष शेलार काय म्हणाले?

आम आदमी पार्टीचे मनिष सिसोदिया ज्यावेळी मद्यसम्राटांशी साटं लोटं करत होते, त्याच वेळेला महाराष्ट्रात साधारण तसाच प्रकार सुरु होता. सिसोदिया तिकडे मद्यसम्राटांवर खैरातीचे धंदे करत होते. त्याच काळात उद्धवजींच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, तळीरामांचं सरकार चालवत होते. विदेशी दारूवरचा ५० टक्के कर माफ, डिस्को पब, बारवरील शुल्क माफ, किराणाच्या दुकानांवरील वाइनची लायसन्स देणे हे सगळे धंदे उद्धव ठाकरे यांचं सरकार त्याच काळात करत होतं. सीबीआय जी चौकशी करतेय, त्यांना हीच शंका उपस्थित होतेय. मनिष सिसोदियांच्या दारू घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत येत आहेत का? उद्धवजींचं सरकार त्या वेळेला मद्यविक्रेत्यांना ज्या खैराती वाटत होतं, त्यांचीही चौकशी होणार का, अशा शंका उपस्थित होत आहेत. त्या दिशेने चौकशी होऊ शकते, असे सूतोवाच आशिष शेलार यांनी केले.

केजरीवाल- ठाकरे भेटीत काय घडलं?

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कदाचित सीबीआय लीकर घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्रापर्यंत येऊन धडकेल, अशी भीती असल्यानेच केजरीवाल एवढ्या तातडीने उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले असावेत, अशी शंका आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

‘ठाकरे गट कायदेशीर नाही’

उद्धव ठाकरेंवर टीका करताना शेलार म्हणाले, ‘ ठाकरे गट हा कायदेशीर नाही. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता नाही. निवडणूक आयोग, विधानपरिषद, सभा, न्यायालयानेही मान्यता दिलेली नाही. आताच्या निर्णयानुसार एकच शिवसेना आहे. त्याचे नेते एकनाथ शिंदे आहेत. दुसरा पक्ष अस्तित्वात आहे का, हाच प्रश्न आहे.

‘उद्धव ठाकरे आसराणीसारखे’

उद्धव ठाकरे यांनी काल अमित शहांचा उल्लेख मोगँबो असा केला. यावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना त्याच तोडीचं उत्तर दिलंय. आशिष शेलार म्हणाले, ‘ उद्धवजींची मनःस्थिती समजू शकतो. थयथयाट, नैराश्य, वैफल्य या गोष्टी समजू शकतो. भाजप टीकेला घाबरत नाहीत. पण राजकारणाच्या संकेतानुसार संयम आणि मर्यादांची अपेक्षा असते. त्या पाळायच्या नसतील आणि आमचं श्रद्धास्थान असलेल्या अमित शहांवर वारंवार फिल्मी नावाने टीका करत असतील तर आम्हालाही संयम सोडावा लागेल. आमच्या कोकणात त्याहून इरसाल शब्द आहेत. तुम्हीसुद्धा हिंदी चित्रपटातील आसराणीसारखे आहात. शोलेतील- आधे इधर, आधे उधर, पिछे है क्या कोई दिख नही रहा… असे आसराणी म्हणजे तुम्ही अशीही आम्ही मांडणी करू शकतो. आज सुरुवात केली आहे. वेळीच थांबला नाहीत, तर सगळ्या मर्यादा सोडू.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.