Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप मैदानात, जागर मुंबईचा यात्रा, काय आहे अजेंडा?

'मराठी मताना फसवण्याचा आणि मुस्लिम मताना भुलवण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न' आशिष शेलारांचे आरोप

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप मैदानात, जागर मुंबईचा यात्रा, काय आहे अजेंडा?
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 3:25 PM

मुंबईः मुंबई महापालिका निवडणूक (BMC election) जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. लवकरच पक्षातर्फे जागर मुंबईचा अशी यात्रा काढली जाणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ही घोषणा केली. नवयुवक आणि तरुणांची माथी भडकवण्यासाठी ठाकरेंच्या (Thackeray) पक्षातर्फे खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. याला वेळीच आळा घालण्यासाठी मुंबईभर भारतीय जनता पार्टी जागर मुंबईचा काढणार आहोत.

नोव्हेंबर महिन्यात मी आणि माझे सहकारी मुंबईभर फिरणार आहोत. विरोधकांचे कपडे जनतेसमोर काढण्याची आवश्यकता आहे, सत्य लोकांसमोर मांडण्याची गरज आहे, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.

22 ऑक्टोबर रोजी ‘सामना’ मध्ये मुखपृष्ठावर स्वतः च्या राजकीय स्वतः साठी मतांची पेरणी करण्याचा एक नवा विचार उद्धव गटाच्या शिवसेनेने केला आहे. एक नरेटिव्ह सेट करण्याची पेरणी आहे. या विचारात लांगुलचालनाचा राजकीय वास आहे.

मुंबई महापालिकेचा पराभव समोर दिसल्यामुळे तुम्ही धर्म आणि जातीच्या मुद्दयांची पेरणी करत आहात का? मराठी हिंदू ह्या विषयाला तुम्ही फारकत का घेत आहात? कसाब ला मराठी सदरा आणि पायजमा घालणार आहत का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

मुंबईकर सावधान औरंगजेबी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धवजी तुम्ही घेतली आहे का? असाही सवाल आशिष शेलार यांनी केलाय. ना जात पर ना धर्म पर… किये हुए विकास के काम पर.. आम्ही मतांची मागणी करू, असं शेलार म्हणाले.

जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती.
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण.
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य.
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप.
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्.
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO.
मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका.
मुंडे समर्थक राजीनाम्यानंतर नाराज, '...त्याची शिक्षा साहेबांना का?'
मुंडे समर्थक राजीनाम्यानंतर नाराज, '...त्याची शिक्षा साहेबांना का?'.
राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा.