शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?,असा हल्लाबोल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला.

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल
सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 10:52 AM

मुंबई :  “महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात ह्यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं…?”, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. (Ashish Shelar Attacked Sharad pawar And Sanjay Raut over Delhi Farmer tractor Ralley)

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर तसंच कालच्या सगळ्या प्रकारावर आज राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर जोरदार तोफ डागली. “दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही”, असं शेलार म्हणाले.

वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत…?

“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?”, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

शरद पवारांनी फेसबुक पोस्ट का केली नाही…?

राऊतांना सवाल विचारताना शेलार यांनी शरद पवार यांनाही टार्गेट केलं. “कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार… कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही… पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही… आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला.

राजकीय सुडापोटी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध

राजकीय सुडापोटी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे, देशवासीय ह्यांना सोडणार नाही. दिल्ली जवान असो वा दिल्ली पोलिस या सगळ्यांनी जो परमोच्च कोटीचा संयम दाखवला तो त्यांच्या पराकोटीच्या देशभक्तीचा नजारा होता. केंद्र सरकार आंदोलनाला ज्या संयमाने सामोरं गेलं त्याबद्दलचं त्यांचं कौतुक करायला हवं, असं शेलार म्हणाले.

अमोल मिटकरींचं शेलारांना प्रत्युत्तर

हे ही वाचा :

ठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत ‘सामंतशाही’ : आशिष शेलार

घराबाहेर पडण्यासाठीच रस्त्यावर उतरण्याचा बहाणा; शेलारांची खोचक टीका

मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय?; राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलार संतप्त

भाजप नेते आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; अर्ध्यातासापासून खलबतं सुरू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.