राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज : शेलार

ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याची बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय.

राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज : शेलार
Sanjay Raut Ashish Shelar
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 1:05 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने (ED) नोटीस बजावली. त्यानंतर राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर तुफान हल्ले चढवले. तसंच आजच्या सामना अग्रलेखातून त्यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. राऊतांनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. भाजपनेही राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय. ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याची बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलीय. (Ashish Shelar Attacked Shivsena Sanjay raut)

“संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे”, अशी टीका शेलार यांनी केलीय.

“संजय राऊतसाहेबांना माझा मैत्रीचा सल्ला असेल की त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत म्हणजे ते ठीक होतील”, असं म्हणत शेलारांनी राऊतांवर शरसंधान साधलं. राऊतांची गेल्या काही दिवसांपासूनची विधाने पाहता त्यांना भाजपद्वेषाने पछाडलंय, असं शेलार म्हणाले.

महापालिकेने प्रभादेवीला चांगलं हॉस्पिटल सुरु करावं

“संजय राऊत यांची वक्तव्ये पाहिली असता त्यांना भाजपविरोधाशिवाय काहीच दिसत नाही, हे स्पष्ट होतं. माझं त्यांना मित्र म्हणून सल्ला असेल की त्यांनी तात्काळ एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून उपचार करुन घ्यावा. त्यासाठी महापालिकेने प्रभादेवीला चांगलं हॉस्पिटल सुरु करावं”, असा टोला शेलार यांनी लगावला.

शिवसेनेची कीव येते

“संजय राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखावर काय प्रतिक्रिया देणार?, मला सेनेची कीव येते. शिवसेना सत्तेसाठी सुसंस्कार, सुसंस्कृतपणा सगळं विसरुन गेली आहे. सत्तेच्या लालसेपायी शिवसेनेने स्वाभिमान गहाण ठेवलाय”, अशा शब्दात शेलारांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.

अग्रलेखातून राऊत भाजपवर बरसले

दुसरीकडे आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजप नेतृत्वाला काही रोखठोक सवाल विचारले होते. करुन सवरुन नामा निराळं राहण्याची आमची अवलाद नाही पण मग भाजपविरोधी पक्षातल्या नेत्यांनाच ईडीच्या नोटीसा कशा? हा कळीचा प्रश्न राऊतांनी आजच्या अग्रलेखातून भाजपला विचारला होता. सरतेशेवटी ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण’, अशा शब्दात राऊत भाजपवर बरसले होते.

हे ही वाचा

ED ने वर्षा राऊत यांना बजावलं समन्स; 5 जानेवारी 2021ला हजर राहण्याचे आदेश

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य; सामनाच्या अग्रलेखातून राऊत बरसले

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.