‘वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? पेंग्विन सेनाप्रमुखांनी उत्तर द्यावं’ आशिष शेलार आक्रमक

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे वेगळे.. हे चालणार नाही... असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.

'वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? पेंग्विन सेनाप्रमुखांनी उत्तर द्यावं' आशिष शेलार आक्रमक
आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्षImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 12:03 PM

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून आज वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातेत नेल्याची टीका करण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिलीच कधी? पेंग्विनसेना प्रमुखांनी याचं उत्तर द्यावं… महाराष्ट्रात भ्रम पसरवण्याचं काम पेंग्विन सेनेच्या माध्यमातून होतंय, असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केलाय. आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसाठी काही प्रश्न उपस्थित केले.

काय म्हणाले शेलार?

पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले, ‘ हा प्रकल्प महाराष्ट्रात होता म्हणताय तर तो सुरु कधी झाला? मविआने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? जिथे तो प्रकल्प प्रस्तावित होता, तिथे जागेचं अॅक्विझिशन तरी झालं होतं का? खेचला म्हणताना या सर्व प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत…

‘याची चौकशी झाली पाहिजे’

वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला म्हणताय तर याची चौकशी करा, अशी विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते म्हणाले, ‘ आता खोटं सहन केलं जाणार नाही. केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणून हिणवणं, यासाठी रान उठवणार असाल तर… उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे वेगळे.. हे चालणार नाही… असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.