आमदारांवर विश्वास नसणारे त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवतात : आशिष शेलार
आमदारांवर विश्वास नसल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली आहे," असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticizes keep mla in hotel) लगावला.
मुंबई : “आमचा आमच्या आमदारांवर आणि त्यांचा आमच्या नेतृत्वावर विश्वास (ashish shelar criticizes keep mla in hotel) आहे. त्यामुळे त्यांना कुठेही एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. आमदारांवर विश्वास नसल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली आहे,” असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticizes keep mla in hotel) लगावला. भाजपच्या विधीमंडळाच्या गटाची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य (ashish shelar criticizes keep mla in hotel) केलं.
“भाजपच्या आमदारांना कुठेही एकत्र ठेवण्याची आवश्यकता नाही, असे मत आमदारांसह सर्व नेत्यांनी व्यक्त केलं. कारण आमचा आमच्या आमदारांवर आणि त्यांचा आमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. जे विश्वासदर्शक प्रस्तावआधीच आपल्या आमदारांवर विश्वास ठेऊ शकत नाही, असे पक्ष म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी. या तिन्ही पक्षांना आपल्या आमदारांना डांबून ठेवावं लागतं ही दुर्देवाची स्थिती आहे,” असेही आशिष शेलार (ashish shelar criticizes keep mla in hotel) म्हणाले.
या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी शिवसेनेवरही टीका केली. “तुमची दिल्लीतील सोनिया गांधीची युती म्हणजे गोराबाजार आणि आमची बारामतीतील राष्ट्रवादीची युती म्हणजे काळाबाजार, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे.”
नुकतंच भाजपच्या विधीमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करण्यासाठी रणनिती आणि चर्चा करण्यात आली. तसेच आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा आम्ही प्रस्ताव संमत केला, असेही आशिष शेलार यांनी (ashish shelar criticizes keep mla in hotel) सांगितले.
“विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र तरी त्या जनादेशाचा अपमान, अनादर, हेटाळणी शिवसेनेने केली. असेही ते म्हणाले. तसेच गेल्या 30 वर्षाच्या युतीच्या परंपरेला स्व:विचाराला शिवसेनेने तेलांजली दिली,” अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 23 नोव्हेंबरला शपथविधी घेतल्यानंतर महाराष्ट्रात विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. आज झालेल्या विधीमंडळाच्या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते. फक्त सांगलीतील मिरज मतदारासंघाचे आमदार सुरेश खाडे हे अनुपस्थित होते. खाडे यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते या बैठकीला हजर राहू शकले नाही असेही आशिष शेलार (ashish shelar criticizes keep mla in hotel) म्हणाले.
दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदार फुटू नयेत यासाठी एकत्र हॉटेलमध्ये ठेवलं आहे. शिवसेनेचे सर्व आमदार अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार रेनिसन्स हॉटेल आणि काँग्रेसचे सर्व आमदार जे.डब्ल्यू मॅरेट या हॉटेलमध्ये आहेत.