भाजपचं मिशन महापालिका, ओबीसी पुन्हा अजेंड्यावर

भाजपनं आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरवली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेवर डोळा ठेवत विशेष व्युहरचना आणख्यात आली.

भाजपचं मिशन महापालिका, ओबीसी पुन्हा अजेंड्यावर
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:04 PM

मुंबई : भाजपनं आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरवली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेवर डोळा ठेवत विशेष व्युहरचना आणख्यात आली. मुंबईसह राज्यातील 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी युवा वॉरियर नावाने नवं संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय भाजपपासून काहीसा बाजूला गेलेला ओबीसी समाजाला पुन्हा साद घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी परिषद घेण्याचीही घोषणा करण्यात आलीय (Ashish Shelar explain future strategy of BJP in Maharashtra).

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी प्रचंड आकर्षण असणाऱ्या नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे ‘युवा वाँरिअर’ असे नवे संघटन भाजपातर्फे उभे करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधे भाजपतर्फे येणार्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्यात येणार आहे,” अशी माहिती भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिलीय.

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या 2 दिवसीय बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रातील 40 हून अधिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात पक्षाची वाटचाल, विस्तार, विविध आघाड्य़ांच्या माध्यमातून पक्षाची वाढ, आगामी नगरपरिषदा, महापालिका निवडणूकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळावे म्हणून रणनीती निश्चित करण्यात आली.

‘राज्यातील 3 सत्ताधारी पक्षांचा भाजप कसा सामना करणार?’

राज्यातील 3 सत्ताधारी पक्षांविरोधात एक भाजप असा सामना झाला, तरी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश कसे मिळेल, शतप्रतिशत भाजपच्या यशाची सविस्तर चर्चा, नियोजन व योजना या बैठकीत निश्चित करण्यात आली, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिलीय. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून जनतेवर होत असलेला अन्याय व त्यासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपने करावयची आंदोलने याबाबतही नियोजन या बैठकीत करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.

युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांना समोरे जाण्यासाठी भाजपने 18 ते 25 वयोगटातील तरुणांची युवा वॉरियर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषदांचं आयोजन केलं आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यामंध्ये भाजपकडून ओबीसी परिषद

राज्यातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला नख लागले. आता ओबीसी समाजाला आणि ओबीसी घटकाला घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री भूमिका घेत आहेत त्यामुळे अशा ओबीसी घटकाला संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी राज्यातील 36 जिल्ह्यामंध्ये भाजपातर्फे येणाऱ्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

आमच्या ताटातील उष्टे, खरकटे खाऊन पोट भरण्याचे काम सुरु

कोकणात ग्रामपंचायत निवडणूकीत ज्यांना जनतेने नंगे केले ते आता भुतांची चर्चा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत पालकमंत्री, खासदार, आमदार भुतासारखे फिरले तरीही अपयशी ठरले तेच आज भुतांची भाषा करत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपातील अनेकांना पक्षप्रवेश देउन शिवसेना उमेदवारी देते आहे. जे स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाहीत, ज्यांनी आत्मविश्वास गमावला आहे असे शिवसेनेचे नेतृत्व आता भाजपाकडे डोळे लावून बसले आहे. कोकणी भाषेत सांगायचे झाले तर, आमच्या ताटातील उष्टे, खरकटे खाउन पोट भरण्याचे काम सध्या सुरु आहे असा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला पक्षप्रवेशावरुन लगावला.

सामनाचा अग्रलेख म्हणजे धडकी भरल्याची लक्षणे

आशिष शेलार म्हणाले, “धडकी मनात भरल्यावर माणूस कसा वागू शकतो याचा प्रत्यय सामनाच्या अग्रलेखात आला. ज्या पद्धतीने मतं आमच्याकडून मिळवली, सलगी मात्र राष्ट्रवादीशी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मतं मिळवायची आणि मग काँग्रेसच्या दरबारात जायचे, हिंदूत्वाची भाषा करुन ‘पहिले मंदिर, बाद मे सरकार’ असं म्हणायचं आणि सत्तेत आल्यावर मंदिर विसरायचे असे ज्यांचे दुटप्पी धोरण आहे अशांच्या मनात धडकी भरते. ‘डंके की चोट’वर म्हणायची त्यांची लायकी उरते का? हा प्रश्न निर्माण होतो.”

हेही वाचा :

‘खारं पाणी गोडं करण्याचा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग’, संदीप देशपांडेंना पुन्हा सेनेवर बाण

आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, पण…..

युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar explain future strategy of BJP in Maharashtra

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.