लपून उत्तर देण्यापेक्षा थेट उत्तरं द्या, चर्चेला कुठेही बोलवा, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान

केंद्र सरकारनं कांजूरमार्गची जागा आमची असल्यामुळं राज्य सरकारनं काम थांबवण्याचं पत्र पाठवल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ( Ashish Shelar gave challenge to Aaditya Thackeray to discussion on open forum Metro Car shade issue)

लपून उत्तर देण्यापेक्षा थेट उत्तरं द्या, चर्चेला कुठेही बोलवा, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 2:28 PM

मुंबई : “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार” आहोत, असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलं आहे. कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरुन भाजपनं आता शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनं कांजूरमार्गची जागा आमची असल्यामुळं राज्य सरकारनं मेट्रोचं काम थांबवण्याचं पत्र पाठवल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ( Ashish Shelar gave challenge to Aaditya Thackeray to discussion on open forum Metro Car shade issue)

“बाफना नावाच्या व्यक्तीने न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. जानेवारी 1997 मध्ये त्यावर स्थगिती आदेश दिला आहे, असा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानंतर आपण महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एवढी मोठी जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय का घेतला?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

कांजूरमार्गच्या जागेबद्दल अनेक न्यायालयात केसेस प्रलंबित आहेत या गोष्टी आपण जनतेला का सांगितल नाही. केंद्र सरकारने 22 सप्टेंबरला या जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता, हे का लपवण्यात आले, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

“कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण उध्दव ठाकरेजी आज काँग्रेस सोबत करताय की काय?”,असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी यावेळी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. काँग्रेसने गिरणीच्या जागा अशाच विकासकांना दिल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपकडून काही चुकलं असेल तर आम्ही जनतेची माफी मागायला तयार आहोत, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

मेट्रो कारशेडवरुन राजकारण तापलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

संंबंधित बातम्या :

Special Report | मेट्रो कारशेडवरुन मोदी Vs ठाकरे, कांजूरमार्गची जागा नेमकी कोणाची?

‘मेट्रो’वरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड

( Ashish Shelar gave challenge to Aaditya Thackeray to discussion on open forum Metro Car shade issue)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.