मुंबई : सध्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या विधानाची जोरदार चर्चा होतेय. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच जेलवारी करावी लागणार असल्याचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. त्याला भाजप नेत्यांचं समर्थन मिळताना दिसत आहे. आधी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कंबोज यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचं म्हटल्यानंतर आशिष शेलार यांनीही समर्थन केलंय. मोहित कंबोज यांचं ट्विट स्वत:मध्येच अर्थपूर्ण आहे. त्यांचा स्टाईक रेट 100% आहे. पुराव्यांविना ते बोलत नाहीत. पूर्ण पुराव्यांनिशी ते बोलतात. आजपर्यंत त्यांनी पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडलेत. त्यांचं ट्विट अधिक महत्वाचं आहे. कुणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळायला हवं. पण कंबोज यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तेच केलंय, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी समर्थन केलं आहे.
@mohitbharatiya_ के ट्वीट ने व्यक्तिगत स्तर पर जानकारी दी है। लेकिन उनका “स्ट्राइकिंग रेट 100% है…!#mohitkamboj pic.twitter.com/3p7X8bmU9O
हे सुद्धा वाचा— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 17, 2022
भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आजही त्यांनी दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्यावर आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलणार नाहीत. त्यांच्याकडे सबळ पुरावे असतील. त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं. भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातूव राष्टरवादीवर निशाणा साधलाय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.”हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असंही ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.