Exam controversy | “उच्च शिक्षणमंत्री पांडूप्रमाणे इसरलंय” आशिष शेलारांच्या ‘कल्पक’ कानपिचक्या

'रात्रीस खेळ चाले" मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची "योग्य वेळ" इसरले की काय? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला (Ashish Shelar pinches Uday Samant giving example of Pandu from Ratris Khel Chale Serial)

Exam controversy | उच्च शिक्षणमंत्री पांडूप्रमाणे इसरलंय आशिष शेलारांच्या 'कल्पक' कानपिचक्या
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 1:02 PM

मुंबई : एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नी ‘हेराफेरी’मधील बाबुभैयाच्या स्टाईलमध्ये निशाणा साधून झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी मालिकांचे संवाद आळवले आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘पांडू’ या प्रसिद्ध पात्राच्या संवादाचा आधार घेत शेलारांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कानपिचक्या लगावल्या. (Ashish Shelar pinches Uday Samant giving example of Pandu from Ratris Khel Chale Serial)

‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय? नाहीतर म्हणायचे, काय त्या? परीक्षा कित्याक..? अण्णानु “इसरलंय”… म्हणून आठवण करुन देतो, विद्यार्थी हित आणि ATKT च्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा!’ असं ‘कल्पक’ ट्वीट आशिष शेलारांनी केलं आहे.

हेही वाचा : Exam controversy | पवारांचा ऑक्सफर्डचा दावा तावडेंनी खोडला, तर विद्यार्थ्यांसाठी संघर्षाची शेलारांची तयारी

आधी बाबुभैयाका स्टाईल

“राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो म्हणाले – “हेराफेरी” मजूरांना अन्नपाणी देतो म्हणाले – “फिर हेराफेरी” मदतीचे पॅकेज देतो म्हणाले – “हेराफेरी पार्ट 2” पदवी परीक्षा रद्द करतो म्हणाले —-? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय घेतो म्हणाले —-? बाबुभैया? ये क्या चल रहा है? महाविकास आघाडी… बाबुभैया, “हेराफेरी”तो है! राज्य सरकारची दानत तर दिसत नाही.. बाबुभैया, सरकारची नियतही साफ वाटत नाही ATKT च्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांच्या बाबतीत “हेराफेरी” होण्याची शक्यता विद्यार्थी मित्र हो! आपल्या शिक्षणाची सरकारला “हेराफेरी” करु द्यायचे नाही” असं ट्वीट आशिष शेलारांनी कालच केलं होतं.

“मी रत्नागिरीत आहे.. दोन दिवसानी मंत्रालयात येतो मग ATKT असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांचा निर्णय घेतो… उच्च शिक्षण मंत्र्यांचा हा सांगावा.. आपण काय करायचं… थांबायचं…? रत्नागिरीवरुन येणाऱ्या एसटीची वाट पाहत बसायचं..? उच्च शिक्षण मंत्री “योग्य” वेळेचा “उदय” होण्याची वाट पाहत आहेत.. आधी परीक्षा रद्द, मग गृहपाठ सुरु… कोरोना रोखण्यात नापास झालेल्या सरकारचे हे “सरासरी” वागणं! सरकार “ढ” सरकारची इयत्ता “फ” म्हणून पंधरा वर्षे ज्या विद्यार्थ्यांनी तपश्चर्या केली त्यांचे नुकसान का?” असा सवाल त्यांनी याआधीही विचारला होता. (Ashish Shelar pinches Uday Samant giving example of Pandu from Ratris Khel Chale Serial)

हेही वाचा : खाटेचे कुरकुरणे समजून घ्या, पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहा, बाळासाहेब थोरातांचे ‘सामना’ला उत्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.