शेलार काल म्हणाले, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आज म्हणाले, आमचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदी…..

आमचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं.

शेलार काल म्हणाले, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आज म्हणाले, आमचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदी.....
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 1:53 PM

पुणे : कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, हे ज्ञानेश महाराव यांच्या वाक्यावर केलेली टिप्पणी होती. आमचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतील, असं भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठणकावून सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच मराठा महिला मुख्यमंत्र्यांबाबत शेलारांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. (Ashish Shelar tells whom he wants to see as Maharashtra CM if get power)

महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेचा निषेध आशिष शेलार यांनी व्यक्त केला. “जो पक्ष मतदारांवर अविश्वास ठेवतो, अशा पक्षावर आणि उमेदवारावर बहिष्कार घालवा. ठाकरे सरकारने वर्षभरात राज्याची दयनीय अवस्था केली, त्याचा मतदारांनी मत पेटीतून निषेध करावा. ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली.

“ठाकरे सरकारने ना पॅकेज दिले ना मदत. मागणी केली की केंद्राकडे बोट दाखवतात, मराठा आरक्षणावर विचारलं की सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात, बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूडकडे लक्ष देतात, त्यांचे चिरंजीव म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पबकडे लक्ष देतात. या सरकारला बॉलिवूड आणि पब या दोनच गोष्टींची चिंता आहे” असा हल्लाबोलही आशिष शेलारांनी चढवला.

“सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर हे सरकार पराधीन आहे. हे सरकार इतकं अकार्यक्षम आहे की कोरोना काळाच्या मदतीत सुद्धा हात आखडता घेतला. शाळा सुरु करण्याच्या मुद्द्यावर सरकारने संभ्रमावस्था निर्माण केली आहे. हे सरकार आहे की छळवणुकीच केंद्र आहे” अशा शब्दात आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला.

“कशाची चौकशी करायची ती करा पण तुम्ही जे आश्वासन दिलं ते तरी पूर्ण करा. 100 युनिट वीज मोफत देणार हे आश्वासन होत ते पूर्ण करा. ऊर्जामंत्री नितीन राऊत वसुली अधिकाऱ्यासारखं बोलतात” अशी टीकाही आशिष शेलारांनी केली.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (Vijay Chormare) यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ (Kartutvavan Maratha Striya) या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं. (Ashish Shelar tells whom he wants to see as Maharashtra CM if get power)

संबंधित बातम्या :

पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार

अरे महाराष्ट्रात सरकार आहे का छळछावणी, काही करणार आहात की नाही; आशिष शेलार संतापले

(Ashish Shelar tells whom he wants to see as Maharashtra CM if get power)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.