विखेंच्या बालेकिल्ल्यात गिरीश महाजन आणि अशोक चव्हाण एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

शिर्डी : चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी सध्या सभांचा धडाका सुरु आहे. शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उद्या संगमनेरमध्ये सभा होत आहे, तर युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी श्रीरामपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे. या दरम्यान शिर्डीतील एकाच पंचतारांकीत हॉटेलमधे राजकीय नेत्यांचा मुक्काम आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे एकाच हॉटेलात […]

विखेंच्या बालेकिल्ल्यात गिरीश महाजन आणि अशोक चव्हाण एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

शिर्डी : चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी सध्या सभांचा धडाका सुरु आहे. शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उद्या संगमनेरमध्ये सभा होत आहे, तर युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी श्रीरामपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे. या दरम्यान शिर्डीतील एकाच पंचतारांकीत हॉटेलमधे राजकीय नेत्यांचा मुक्काम आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे एकाच हॉटेलात योगायोगाने मुक्कामी आहेत. अशोक चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यात भेट होते का अशी उत्सुकता दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती, तर पत्रकारही वाट पाहत होते. मात्र अशोक चव्हाण यांनी अशा भेटीची शक्यता नसल्याचं श्रीरामपूर येथील सभेत जाण्यापूर्वी स्पष्ट केलं.

चौथ्या टप्प्यातील 17 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी सभांचा धडाका सुरु आहे. शिर्डी मतदारसंघात विखे पाटील कुटुंबाचं वर्चस्व मानलं जातं. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना पक्षाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामाही दिलाय. त्यामुळे विखे राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहतात का त्याकडेही लक्ष लागलंय.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत, काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याची टीका केली होती. शिवाय त्यांची राजकीय भूमिका ते 27 तारखेला जाहीर करणार आहेत. सध्या ते जाहीरपणे शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विखे पाटलांवर काय निर्णय होतो, त्याकडे लक्ष लागलंय.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे पाटलांचं मोठं वर्चस्व आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटलांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात बैठकींचं आणि मेळाव्यांचं सत्र सुरू केलं आहे. संगमनेरमध्ये सुजय यांनी आज पाच छोट्या-मोठ्या सभा घेत थोरातांवर टीकेची झोड उठवली. युतीचं प्रामाणिकपणे काम करा, पाच वर्षात घड्याळ आणि पंजा हद्दपार करू, असं भाष्य सुजय यांनी संगमनेरातील सभेत केलं.

व्हिडीओ पाहा :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.