अशोकराव लीडर नाही, डीलर आहेत : मुख्यमंत्री

नांदेड : “अशोकराव हे लीडर नाही, डीलर आहेत”, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केला. अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आज भाजपची प्रचार सभा होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर टीका करत, त्यांनी मुख्यमंत्री होऊनही नांदेडचा विकास का केला नाही, असा सवाल केला. लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपडून मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा […]

अशोकराव लीडर नाही, डीलर आहेत : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नांदेड : “अशोकराव हे लीडर नाही, डीलर आहेत”, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केला. अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आज भाजपची प्रचार सभा होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर टीका करत, त्यांनी मुख्यमंत्री होऊनही नांदेडचा विकास का केला नाही, असा सवाल केला.

लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपडून मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेतल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागो-जागी जाऊन सभा घेत आहेत. गुढीपाडव्याला आज नांदेड मतदारसंघात भाजपची मोठी सभा भरवण्यात आली आहे. येथे मुख्यमंत्र्यानी माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना डीलर म्हणून संबोधलं.

“अशोक चव्हाण यांना इतक्यावेळा मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं. त्यांना इतक्या संधी दिल्या. मात्र, तरीही ते या नांदेडचा चेहरा बदलू शकलेले नाही. त्यांनी कुठल्याही पद्धतीने नांदेडचा विकास केला नाही. ते यासाठी विकास करु शकले नाही, कारण ते लीडर नाही तर डीलर आहेत. त्यांच्याकडे अनेक एजन्सी आहेत”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर केली. त्यामुळे गेल्यावेळी जरी थोडक्यात नांदेड हुकलं असेल, मात्र आता हुकू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नांदेडकरांना केलं.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. “आमच्या जवानांवर कुणी हल्ला केला, तर आम्ही त्यांच्या देशात घुसून त्यांचा खात्मा केला आणि काँग्रेस आता देशद्रोहाचा गुन्हा रद्द करायला निघाली आहे”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच, “हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की, जैश-ए-मोहम्मदचा राजीनामा, हे मला आधी सांगा”, असे म्हणत राहुल गांधींचं भाषण हे काल्पनिक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात भाजपच्या कामाची पावती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मराठवाड्यात तेरा हजार कोटींची विकास कामं सुरू आहेत. तर, एकट्या नांदेड जिल्ह्यात आम्ही पाच हजार कोटींची विकास कामं करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.