महाविकास आघाडीचं सरकार पाडूनच दाखवावं; अशोक चव्हाण यांचं विरोधकांना खुलं आव्हान

"विविध राज्यांतील बिगर भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच" असे म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे. (Ashok Chavan openly challenged opposition to destabilize the the state government)

महाविकास आघाडीचं सरकार पाडूनच दाखवावं; अशोक चव्हाण यांचं विरोधकांना खुलं आव्हान
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 8:25 PM

औरंगाबाद : “राज्यांतील बिगर भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सकारकडून सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच” असं खुलं आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विरोधकांना दिलं आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यात माध्यमांशी बोलत होते. (Ashok Chavan openly challenged opposition to destabilize the the state government)

“भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील सरकारे पाडण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. केंद्र सरकार राज्यातील सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातही तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आमचं सरकार भक्कम असून ते त्यांनी पाडून दाखवावंच. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारतो” असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपला दिलेल्या आव्हानाचाही यावेळी त्यांनी पुनरूच्चार केला.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे आव्हान

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजकडून सातत्याने केला जातोय, असा आरोप वेळोवेळी केला जातोय. रविवारी (25 ऑक्टोबर) मुंबईत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात शिवसेनेने आयोजित केलेल्या दसरा मेळावा आयोजित केला होत. येवेळी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरुन विरोधकांना चांगलंच घेरलं. “सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आलं. तरीही विरोधक तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.” असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. तसेच, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत विरोधकांना चांगलच फैलावर घेतलं होतं. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनीही विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.

दरम्यान, आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे व्यक्त केला. निवडणूक जिंकणे एवढाच विषय केंद्र सरकारसमोर आहे. बाकी कशाचे देणे घेणे नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना शुभेच्छा देत भविष्यात भाजपचं वर्चस्व नक्की कमी करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

CM Uddhav Thackeray Speech | कळसूत्री बाहुल्यांचा खेळ संपवला, यापुढे राज्यात मर्द मावळ्यांचं सरकार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Ashok Chavan openly challenged opposition to destabilize the the state government)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.