अशोक चव्हाण यांना भाजपाची ऑफर, विखे पाटील यांच्या वक्तव्यावर म्हणाले, ते माझे मित्र… काँग्रेसमध्ये गोंधळ…!

विखे यांनी मला दिलेली ही ऑफर पाहता ते माझे मित्र आहेत की शत्रू असा सवाल ही चव्हाण यांनी उपस्थित केलाय.

अशोक चव्हाण यांना भाजपाची ऑफर, विखे पाटील यांच्या वक्तव्यावर म्हणाले, ते माझे मित्र... काँग्रेसमध्ये गोंधळ...!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 2:23 PM

राजीव गिरी, नांदेड : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील अशी अनेकदा चर्चा होते. गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षांतर्गत वाद अधिकच उफाळून आले. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये काहीही ठेवलेलं नाही. तुम्ही भाजपात यावं, अशी ऑफर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) यांनी चव्हाण यांना दिली होती. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना यावरून स्पष्ट भूमिका मांडली. राधाकृष्ण विखे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने ते असं वक्तव्य करत असतील तर ते मित्र आहेत की शत्रू याचा विचार करावा लागेल, असं चव्हाण म्हणालेत.

काय म्हणाले चव्हाण ?

राज्याच्या राजकारणात माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे माझे मित्र आहेत पण त्यांची ऑफर मला अमान्य आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.

विखे यांची ही ऑफर…

‘ विखे यांनी मला दिलेली ही ऑफर पाहता ते माझे मित्र आहेत की शत्रू असा सवाल ही चव्हाण यांनी उपस्थित केलाय. तसेच विखे यांच्या त्या वक्तव्यामागे काँग्रेस मध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे का अशी शंका मला येत आहे.

विखे पाटील यांचं वक्तव्य काय?

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना उद्देशून काल एक वक्तव्य केलं. काँग्रेसमध्ये काही उरलं नाही. काँग्रेसचं भविष्य काय आहे. अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनीदेखील विचार करायला हवा…सध्याच्या घडीला जगाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे चव्हाण यांनीही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करावं, अशी ऑफर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विखे पाटील यांच्या ऑफरवरून आक्रमक प्रतिक्रिया दिली. ज्या काँग्रेसने विखे पाटील यांना एवढं मोठं केलं, त्या काँग्रेसमध्ये काही राहिलं नाही, असं म्हणतात. म्हणजे ते सत्तेसाठीच आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. उद्या काँग्रेसची सत्ता आली तर विखे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील का, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.