अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली […]

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली : इम्तियाज जलील
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, महापालिकेत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार त्यांनी लोकसभेला दिलाय, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय.

काँग्रेसने औरंगाबादमधून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांनी उमेदवारी दिली आहे. हाच धागा पकडत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. जे लोक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत अशा लोकांना लोकसभेचं तिकीट दिलंय. त्यामुळे लोकसभेचे निकाल येतील तेव्हा स्पष्ट होईल की काँग्रेसचे दुश्मन हे बाहेरचे नाहीत, तर घरातलेच आहेत, असा घणाघाती आरोप इम्तियाज जलील यांनी काँग्रेसवर केला.

इम्तियाज जलील यांना बहुजन वंचित आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत जलील यांनी विजय मिळवला होता. औरंगाबादमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असल्याने औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही जलील यांच्या नेतृत्त्वात एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले होते.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून सुभाष झांबड हे मैदानात आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या जागेसाठी तिरंगी लढत होईल. औरंगाबादसाठी दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांचाही समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.