दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचं काम भाजपचं, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
"आपण त्यांना पटवून देऊ शकत नसल्यास गोंधळात टाका," असे इंग्रजीत म्हटलं जातं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटवरुन दिली (Ashok Chavan answer ajit pawar tweet) आहे.
मुंबई : “आपण त्यांना पटवून देऊ शकत नसल्यास गोंधळात टाका,” असे इंग्रजीत म्हटलं जातं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटवरुन दिली (Ashok Chavan answer ajit pawar tweet) आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली (Ashok Chavan answer ajit pawar tweet) आहे. मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. या ट्विटला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं (Ashok Chavan answer ajit pawar tweet) आहे.
“इंग्रजीत म्हटलं जातं, If you can’t convince them, confuse them… म्हणजेच आपण त्यांना पटवून देऊ शकत नसल्यास गोंधळात टाका. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने आता हाच प्रकार सुरु केल्याचं दिसतयं…” असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं (Ashok Chavan answer ajit pawar tweet) आहे.
इंग्रजीत म्हटलं जातं, If you can’t convince them, confuse them… दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनं आता हाच प्रकार सुरू केल्याचं दिसतंय…#MahaPoliticalTwist https://t.co/TjWgR89KvB
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 24, 2019
या ट्विटपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपवरही टीका केली होती. “कालच्या महा राजकीय नाट्यानंतर तांत्रिकदृष्ट्या अजित पवार हेच कसे राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत, ते पटवून देण्याचा खटाटोप भाजपने सुरू केला आहे. प्रारंभी आमदारांचे बहुमत असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे आता तांत्रिक मुद्यावर येणे, हा त्यांच्या पराभूत मानसिकतेचा संकेत आहे.” असे त्यांनी ट्विटवर म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांनी ट्विटरवर सक्रीय होत भाजपच्या प्रत्येक नेत्याचे आभार मानणारे ट्वीट केले होते. यातून त्यांनी ‘घरवापसी’ न करण्याचे संकेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले होते.
कालच्या #MahaPoliticalTwist नंतर तांत्रिकदृष्ट्या अजित पवार हेच कसे राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत, ते पटवून देण्याचा खटाटोप भाजपने सुरू केला आहे. प्रारंभी आमदारांचे बहुमत असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे आता तांत्रिक मुद्यावर येणे, हा त्यांच्या पराभूत मानसिकतेचा संकेत आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 24, 2019
आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी ट्विटद्वारे (Ashok Chavan answer ajit pawar tweet) दिली.
भाजप की राष्ट्रवादी? अजित पवारांचं उत्तर
‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार पुढे म्हणाले.
उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर रविवारी संध्याकाळच्या सुमारास अजित पवारांनी एकामागून एक ट्वीट करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार (Ashok Chavan answer ajit pawar tweet) मानले.
संबंधित बातम्या :
अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं, शरद पवार कडाडले
अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं, शरद पवार कडाडले
पवार साहेबांचा आदर करुन परत या, जयंत पाटलांचं अजित पवारांना आवाहन