महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांनी पुस्तक छापणे ही पहिलीच घटना: मंत्री अस्लम शेख
महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांनी पुस्तक काढणे ही पहिली घटना आहे. राज्यपाल एका विशिष्ट भूमिकेत दिसतात, त्यांनी मुख्यमंत्र्यांना ज्या प्रमाणे पत्र लिहिले त्याप्रमाणेच शरद पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिले, असं वक्तव्य मुंबई शहरचे पालकमंत्री आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. (Aslam Shaikh said Bhagatsingh Koshyari is first governor who published book )
मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांनी पुस्तक काढणे ही पहिली घटना आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील जुने जाणते नेते आहेत, त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुस्तकाबद्दल केलेल्या वक्तव्यात काही चुकीचं नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ज्या प्रमाणे पत्र लिहिले त्याप्रमाणेच शरद पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिले, असं वक्तव्य मुंबई शहरचे पालकमंत्री आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. (Aslam Shaikh said Bhagatsingh Koshyari is first governor who published book )
रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी टप्प्याटप्प्याने रेल्वेची संख्या वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आपण आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली. त्यानंतर वकील आणि मग महिलांना प्राधान्य दिलं होतं. आता सर्वसामान्य नागरिकांना एक स्लॉट देऊन लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत राज्य सरकारने मागणी केली आहे. हा निर्णय लवकरात लवकर झाल्यास सर्व रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. याविषयी अस्लम शेख यांनी आपला पक्ष मोठा व्हावा हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा असतो, असं अस्लम शेख म्हणाले आहेत. शिवसेनेने तशी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपला पक्ष मोठा व्हवाा हे प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असतं, असं अस्लम शेख म्हणाले.
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या अंतिम यादीवर उद्या शिक्कामोर्तब होण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. कोणाची नाव आहेत याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी जास्त माहिती देऊ शकतील, असं म्हणत अस्लम शेख यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले.
सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी राज्याचे रेल्वेला पत्र
सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नसून रेल्वे मंत्रालयाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.
कोव्हिडशी संबंधित सर्व काळजी घेऊन सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. त्यासाठी विविध टप्प्यांत वेळा निश्चित करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
महिला भाज्या आणायला लोकलमधून जाणार नाहीत; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं
(Aslam Shaikh said Bhagatsingh Koshyari is first governor who published book )